सध्या संपूर्ण देश क्रिकेटपटू विराट कोहोली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत. यादरम्यान अमूल इंडियानेसुद्धा विराट- अनुष्काला आपल्या पहिल्या मुलीच्या जन्माबद्दल एका वेगळ्या पद्धतीने स्वागत करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमूल इंडियाने ट्विटरवर एक सुंदर कार्टून शेअर केले आहे. या ट्विटमध्ये या डिलिव्हरीने बोल्ड केले, घरात तुझे स्वागत आहे. असं म्हटलं आहे.
अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांना ११ जानेवारीला कन्यारत्न झाली आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे आणि त्यांच्या क्लबमध्ये विराटचा समावेश झाला आहे.
विराटनं ट्विट केलं होतं की,''तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या घरी कन्यारत्न आली. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल. तुमचा विराट''
Web Title: Amul welcomed virat anushkas daughter in a special way shared cute cartoon
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.