मार्केटिंगचा भन्नाट फंडा! जर रस्त्याने जाताना सापडेल 100 रूपयांची नोट तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:03 IST2024-04-10T15:33:52+5:302024-04-10T16:03:00+5:30
सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक कॅफेवाल्यांचं कौतुकही करत आहेत.

मार्केटिंगचा भन्नाट फंडा! जर रस्त्याने जाताना सापडेल 100 रूपयांची नोट तर...
Smart Advertising Jugaad: आजच्या काळात मार्केटिंग आणि जाहिरातींवर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्याशिवाय कामही भागत नाही. काहीतरी वेगळं केलं तरच ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात. असाच वेगळा विचार करून काही लोकांनी कॅफेची जाहिरात करण्यासाठी एक अनोखी आयडिया समोर आणली आहे. यासाठी त्यांनी शंभर रूपयांसारखा दिसणाऱ्या कागदाचा वापर केला. सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक कॅफेवाल्यांचं कौतुकही करत आहेत.
जर कुणालाही रस्त्याने जातात पैसे सापडले तर फार कमी असे लोक असतात जे ते उचलत नाहीत. त्यात जर 100 रूपयांची नोट असेल तर कुणीही उचलेल. हीच मानसिकता ध्यानात ठेवून. ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कागदाच्या एका बाजूला 100 रूपयांची नोट छापली आहे. तर दुसऱ्या बाजूने कॅफेची जाहिरात आहे. नक्कीच 100 रूपयांची नोट समजून ती कुणीही उचलेल. कशी का होईना पण जाहिरात त्यांच्यापर्यंत पोहोचेल.
इन्स्टावर हा व्हिडीओ @cafe_mantralay नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाख 11 हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. तर व्हिडिओ पाहिलेल्या यूजरने यावर एक चांगली आणि वेगळी आयडिया असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. तर काही म्हणाले की, ही तर फसवणूक आहे.