तरूणीच्या सुंदर केसांवर फिदा झाले लोक, कुणाला करायचंय लग्न तर कुणाला घ्यायचाय केसांचा सुगंध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 12:36 IST2019-12-24T12:25:05+5:302019-12-24T12:36:53+5:30

आता झालं असं की, तिला कितीतरी तरूणांनी लग्नासाठी मागणी घालत आहेत.

Alena Kravchenko with 1.8m hair gets constant marriage proposals | तरूणीच्या सुंदर केसांवर फिदा झाले लोक, कुणाला करायचंय लग्न तर कुणाला घ्यायचाय केसांचा सुगंध...

तरूणीच्या सुंदर केसांवर फिदा झाले लोक, कुणाला करायचंय लग्न तर कुणाला घ्यायचाय केसांचा सुगंध...

Alena Kravchenko ही ३४ वर्षीय तरूणी तिच्या लांब केसांसोबत आणखी एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. Alena ही दिसायला सुंदर तर आहेच सोबतच तिचे केसही सुंदर आहेत. तिच्या केसांची लांबी १.८ मीटर इतकी आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आता झालं असं की, तिला कितीतरी तरूणांनी लग्नासाठी मागणी घातली आहे. 

यूक्रेनमधील Alena Kravchenko ही गेल्या ३० वर्षांपासून केस वाढवत आहे. तर इन्स्टाग्रामवर तिचे १३.३ के फॉलोअर्स आहेत. मजेदार बाब म्हणजे Alena लग्नासाठी मेसेजेस तर येतच आहेत सोबतच काही लोकांना तिच्या केसांचा सुंगधही घ्यायचा आहे. 

यावर Alena म्हणाली की, 'एकतर मला हे फार गमतीदार वाटतं जेव्हा अनोळखी लोक मला लग्नासाठी मेसेज करतात. ते माझे लांब केस बघून त्यांच्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकत नाहीत. मलाही त्यांचं असं वागणं आवडतं'.

ती सांगते की, 'माझे चाहते सर्वात चांगले आहेत. त्यांच्या सकारात्मक आणि प्रेमळ कमेंट्समुळे मला फार आनंद होतो. त्यातील सर्वात वेगळी कमेंट म्हणजे एका माझ्या केसांचा सुंगध घेण्याची इच्छा व्यक्त केली'.

इतक्या सुंदर केसांची ती काळजी कशी घेते याबाबत तिने सांगितले की, 'केसांची काळजी घेण्यासाठी माझा बराच वेळ जातो. दिवसातून दोनदा मला केस कोम्ब करावे लागतात. तर सहा महिन्यातून एकदा मी केस ट्रीम करते. तसेच आठवड्यातून एकदाच मी केस धुते'.


Web Title: Alena Kravchenko with 1.8m hair gets constant marriage proposals