फ्लाइटमध्ये वापरलेल्या अंडरविअर विकत होती ही एअरहोस्टेस, कोट्याधीश झाल्यावर सोडली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:29 IST2021-10-22T18:25:28+5:302021-10-22T18:29:30+5:30
डेली स्टारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एका एक्स एअरहोस्टेसने खळबळजनक खुलासा केला आहे की, तिने फ्लाइटमध्ये तिच्या पॅंटीज विकून लाखो रूपये कमावले.

फ्लाइटमध्ये वापरलेल्या अंडरविअर विकत होती ही एअरहोस्टेस, कोट्याधीश झाल्यावर सोडली नोकरी
जगभरात रोज विचित्र घटना घडत असतात. काहींबाबत वाचून हैराण व्हायला होतं तर काही वाचून धक्का बसतो. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून तुम्ही विचारात पडाल. तुम्ही कधी एखाद्या महिलेचे वापरलेले अंतर्वस्त्र खरेदी केलेत? जास्तीत जास्त लोक यावर नाही असंच उत्तर देतील. पण एक माजी एअरहोस्टेस तिचे वापरलेले अंडरगारमेंट्स विकून कोट्याधीश बनली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ एक पॅंटी विकून तिला एक लाख रूपये मिळत होते.
फ्लाइटमध्ये विकत होती वापरलेले अंतर्वस्त्र
डेली स्टारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एका एक्स एअरहोस्टेसने खळबळजनक खुलासा केला आहे की, तिने फ्लाइटमध्ये तिच्या पॅंटीज विकून लाखो रूपये कमावले. जॅस्मीन पिंक नावाच्या महिलेने सांगितलं की, ती शिफ्टमध्ये सतत होत असलेल्या बदलामुळे आणि १२ तासांच्या वर्किंग आवरमुळे वैतागली होती. यामुळे तिने एअरहोस्टेसची नोकरी सोडली. दोन वर्षाच्या नोकरीनंतर जॅस्मीनने भलेही नोकरी सोडली असेल, पण त्याआधीच ती फ्लाइटमध्ये तिचे वापरलेले अंतर्वस्त्र प्रवाशांना विकत होती.
सेव्हिंग करून सोडली नोकरी
नोकरी सोडण्याआधी जॅस्मीन फ्लाइटमध्ये असं काम करत होती, ज्यामुळे तिच्याकडे लाखो रूपयांची सेव्हिंग आहे. तिने खुलासा केला आहे की, तिच्या एका अंडरगारमेंट्सला लोक एक लाख रूपयेही देण्यास तयार होत होते. घाणेरडे अंडरगारमेंट्स विकून जॅस्मीनने नोकरी सोडली. त्यानंतर ती तिच्या कामात बिझी झाली. जॅस्मीनने एक वेबसाइट काढली आणि त्यावरून तिचे वापरलेले अंडरगारमेंट्स विकू लागली. आता ती या पैशांमधून आरामदायक जीवन जगत आहे.
झाली कोट्याधीश
तिने सांगितलं की, ती जेव्हा एअरहोस्टेस होती तेव्हा ती महिन्यातून २ लाख रूपये कमावत होती. पण आता ती केवळ तिचे वापरलेले अंडरगारमेंट्स विकून त्यापेक्षा जास्त कमाई करत आहेत. जॅस्मीन एडल्ट साइटला आपले फोटो विकते. त्यातूनही तिची चांगली कमाई होते.