हॉस्पिटलच्या बेडवरील चादर कधी बदलली कळणार, केरळनंतर गुवाहाटी सरकारचा उत्तम उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:04 IST2025-02-04T16:01:27+5:302025-02-04T16:04:01+5:30
अनेकदा अनेक दिवसांपासून आधीच्या रूग्णांनी वापरलेल्या चादरींवर रूग्णांना झोपण्याची वेळ येते. अनेकदा तर हॉस्पिटलमधील बेडवरील चादर कधी बदलली हे आपल्या माहितीच नसतं.

हॉस्पिटलच्या बेडवरील चादर कधी बदलली कळणार, केरळनंतर गुवाहाटी सरकारचा उत्तम उपक्रम
सरकारी हॉस्पिटलमधील स्वच्छतेबाबत नेहमीच सर्वसामान्य लोकांकडून ओरड केली जाते. कधी वॉटर कुलरच्या स्वच्छतेवरून तर कधी बेडशीटवरून तक्रारी येत असतात. अनेकदा अनेक दिवसांपासून आधीच्या रूग्णांनी वापरलेल्या चादरींवर रूग्णांना झोपण्याची वेळ येते. अनेकदा तर हॉस्पिटलमधील बेडवरील चादर कधी बदलली हे आपल्या माहितीच नसतं. अशात रूग्णांना स्वच्छ बेडशीट आणि चांगलं वातावरण मिळावं म्हणून केरळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये बेडवरील चादरींवर ती कोणत्या दिवशी टाकली असं लिहिलं जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आता गुवाहाटीच्या हॉस्पिटलमध्येही असंच केलं जाणार आहे.
कलर-कोड सिस्टीम
केरळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रोज वार्डातील चादरी बदलण्याचं एक नवीन उदाहरण सादर केलं आहे. ही प्रक्रिया आणखी सोयीस्कर बनवण्यासाठी कलर-कोड सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे रूग्णांना रोज स्वच्छ चादरी मिळतील. अशात बेडशीट टर्न आठवड्यातून केवळ एकदाच येईल. यासाठी आरोग्य विभागाकडून नवीन चादरी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
चादरीवर लिहिला असतो वार
या नवीन उपक्रमानं हॉस्पिटलमधील बेड चादरींमुळे स्वच्छ दिसतील. केरळच्या सर्वच सरकारी हॉस्पिटलमधील चादरींवर सोमवार, मंगळवार, बुधवार असे वार प्रिंट करण्यात आले आहेत. असं केल्यावर हे कळून येईल की, चादर शेवटची कधी बदलण्यात आली होती. सोप्या भाषेत सांगायचं तर सोमवारी टाकण्यात आलेल्या चादरीवर सोमवार लिहिलेलं असेल. केरळ प्रशासनाच्या या उपक्रमामुळे रूग्णांना चांगली सुविधा मिळेल, सोबतच रूग्णांना फ्रेशही वाटेल.
आंध्रातही लागू आहे ही सुविधा
सोशल मीडियावर यूजर्स केरळ सरकारच्या या उपक्रमाचं कौतुक करत आहेत. केरळ सरकारआधी आंध्र प्रदेशमध्ये २०१७ पासून ही सुविधा लागू आहे. मध्य प्रदेशच्या इंदुरमधील सरकारी हॉस्पिटलमध्येही २०१९ पासून ही सुविधा सुरू करण्यात आली. सरकारी हॉस्पिटलमध्ये जास्तकरून चादरी पूर्ण खराब होईपर्यंत आणि रूग्णांनी मागणी करेपर्यंत बदलल्या जात नाहीत.