मुंबईतील न्हाव्याकडून रशियन तरूणीने करून घेतली हेड मसाज, बघा त्यानंतर काय म्हणाली ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 05:03 PM2024-06-19T17:03:30+5:302024-06-19T17:04:11+5:30

Viral Video : आधी तर ती मसाजमुळे हैराण झालेली दिसली पण नंतर ती आनंदी दिसली. बघा कसा होता मुंबईत एका पुरूषाकडून मसाज करून घेण्याचा तिचा अनुभव.

A young Russian girl got a head massage from a barber in Mumbai, see what she said afterwards... | मुंबईतील न्हाव्याकडून रशियन तरूणीने करून घेतली हेड मसाज, बघा त्यानंतर काय म्हणाली ती...

मुंबईतील न्हाव्याकडून रशियन तरूणीने करून घेतली हेड मसाज, बघा त्यानंतर काय म्हणाली ती...

Viral Video : भारतात नेहमीच परदेशी पर्यटक फिरायला येतात आणि येथील वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेतात. त्यांचे व्हिडीओही ते शेअर करत असतात. आजकाल तर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर भारतात फिरायला येतात आणि त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका रशियन तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिचा हा व्हिडीओ एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या लसूनमधील आहे. ही तरूणी मुंबईच्या एका लोकल सलूनमध्ये गेली आणि तिने मसाजचा आनंद घेतला. आधी तर ती मसाजमुळे हैराण झालेली दिसली पण नंतर ती आनंदी दिसली. बघा कसा होता मुंबईत एका पुरूषाकडून मसाज करून घेण्याचा तिचा अनुभव.

मार्या (@maryatheofficial) एक रशियन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिला इन्स्टावर १२ लाख लोक फॉलो करतात. ती नुकतीच भारतात आली असून ताजमहालला भेट दिली. अनेक रील्स बनवले. तिने मुंबईत सगळ्यात वेगळा अनुभव घेतला. तिने इथे एका न्हाव्याकडे डोक्याची मसाज करून घेतली. मुंबईच्या खारमध्ये ती संदीप शर्मा नावाच्या न्हाव्याकडे गेली. त्याचं रस्त्याच्या बाजूला एक छोटं दुकान आहे.

इथे मार्याने हेड मसाज करवून घेतली. संदीपने तिची मसाज कशी केली हे तुम्ही व्हिडीओत बघू शकता आणि सोबतच तिचे हावभावही बघू शकता. आधी तर ती हैराण झाल्यासारखी दिसत होती. पण नंतर तिने आनंद व्यक्त केला. अर्थात मार्याला अशा मसाजची सवय नक्कीच नसेल. त्यामुळे तिच्यासाठी हा फारच वेगळा अनुभव होता. 

या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. यात काही मजेदार कमेंट्स आहेत. एका यूजरने लिहिलं की, "मसाजनंतर तिला इतकं चांगलं वाटत आहे की, ती जणू बेशुद्ध पडणार आहे". दुसऱ्याने लिहिलं की, "न्हावी मसाजच्या नावावर आपला राग काढत आहे". तिसऱ्याने लिहिलं की, "भावा, पाठीचा कणा तर मोडला नाही ना!".

Web Title: A young Russian girl got a head massage from a barber in Mumbai, see what she said afterwards...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.