शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

४ लाखांचं शर्ट, ८० हजारांचे मोजे…कोट खरेदी करण्यात खर्च करावी लागेल वर्षाची सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:44 IST

पाहा काय आहे यात इतकं खास?

तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर किती रुपायांना सॉक्स घेत असाल? कदाचित 50, 100 किंवा 1000 रुपये... तुम्हाला विकुना फॅब्रिक माहितीये? विकुना फॅब्रिकच्या मोज्यांची किंमत पाहूनच सर्वांचे डोळे पांढरे पडतील. जितकी महिन्याची सॅलरी असेल किंवा त्यापेक्षाही जास्तच तितकी या फॅब्रिकच्या मोज्यांची किंमत आहे. होय, विकुना फॅब्रिकच्या सॉक्सची किंमत 80,000 रुपयांपर्यंत आहे. शर्टची किंमत सांगितली तर पायाखालची जमीन सरकेल. या फॅब्रिकपासून बनवलेले स्कार्फ 5 ते 5.5 लाख रुपयांना मिळतात. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या फॅब्रिकची खासियत जाणून घेणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.

जगातील सर्वात महागडं फॅब्रिकजगातील सर्वात महागडं फॅब्रिक म्हणजे विकुना. हे लक्झरी आणि सर्वात महाग फॅब्रिकमध्ये गणले जाते. त्यातून बनवलेले कपडे विकत घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. लोरो पियाना या इटालियन कंपनीच्या वेबसाइटवर विकुला फॅब्रिकपासून बनवलेल्या कपड्यांची विक्री किंमत पाहिली तर एका मोज्यांच्या जोडीची किंमत 80 हजार रुपये आहे, तर शर्ट 4 ते 5 लाख रुपयांना विकला जात आहे.

कपड्यांचीही किंमत अधिकलोरो पियानामध्ये विकुना फॅब्रिकपासून बनवलेल्या कपड्यांच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळतील. या कपड्यांची किंमत बघितली तर 80,000 रुपये किमतीचे मोजे, 4,23,000 रुपये किमतीचे शर्ट आणि 9,11,000 रुपये किमतीचे पोलो नेक टी-शर्ट आहेत. विकुना फॅब्रिकच्या पॅंटची किंमत 8 लाख 97 हजार रुपये आणि कोट 11 लाख 44 हजार रुपयांना मिळेल. दुसरीकडे, तुम्ही मॉलमध्ये जे स्कार्फ 500 ते 1,000 रुपयांना खरेदी करता, ते तुम्हाला तिथे 5 लाख रुपयांना मिळतील.

का आहे इतकं महाग?विकुना फॅब्रिक विशेष उंटाच्या केसांपासून तयार केले जाते. हे लहान आकाराचे उंट दक्षिण अमेरिकेतील एका विशेष भागात आढळतात. उंटांची ही प्रजाती नामशेष होत आहे. 1960 मध्येच त्यांना दुर्मिळ प्रजाती घोषित करण्यात आली होती. या उंटांचे संगोपन आणि पाळण्याचे नियम अतिशय कडक आहेत. विकुना हे अत्यंत बारीक, हलकी आणि उबदार असते. विकुनाची जाडी 12 ते 14 मायक्रॉन असते. हे कापड खूप गरम असतात, त्यामुळे त्यांची किंमतही खूप जास्त असते. विकुनापासून बनवलेला कोट बनवण्यासाठी सुमारे 35 उंटांची लोकर काढावी लागते. त्यानुसार, आपण त्याचे किंमतीचा अंदाज लावू शकता. इटलीच्या लोरो पियाना कंपनीने विकुनासाठी खास अभयारण्य बनवले आहे. पेरूजवळ 5,000 एकरवर उंटांचं पालन केले जाते. त्यांची विशेष काळजी घेतली जाते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके