एक असं ठिकाण जिथे आपोआप 'चालतात' दगड, वैज्ञानिकही झाले हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:04 IST2024-08-05T15:44:49+5:302024-08-05T16:04:05+5:30
Death Valley : या चालणाऱ्या दगडांवर अनेक वर्ष रिसर्च केले गेले. तरीही त्यांचं रहस्य काही उलगडण्यात कुणाला यश मिळालं नाही.

एक असं ठिकाण जिथे आपोआप 'चालतात' दगड, वैज्ञानिकही झाले हैराण...
Death Valley : जर कुणी तुम्हाला म्हटलं की, दगड आपोआप चालतात. तर नक्कीच तुम्ही समोरच्या व्यक्तीला वेड्यात काढाल. कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे की, दगड निर्जिव असतात. पण एक ठिकाण असं आहे जिथे खरंच दगड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.
हे ठिकाण अमेरिकेत आहेत. इथे दगड चालतात. या चालणाऱ्या दगडांवर अनेक वर्ष रिसर्च केले गेले. तरीही त्यांचं रहस्य काही उलगडण्यात कुणाला यश मिळालं नाही.
कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये 'रेस ट्रॅक प्लाया' नावाचा एक कोरडा तलाव आहे. हा तलाव २.५ मैल उत्तर ते दक्षिण आणि १.२५ मैल पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरला आहे. यात पूर्ण जमीन सपाट आहे.
या ठिकाणावरील एक अजब बाब म्हणजे या कोरड्या तलावात असलेले दगड आपोआप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण सरकतात. त्यामुळेच या ठिकाणाल डेथ व्हॅली असं नाव देण्यात आलं कारण इथे निर्जिव गोष्टही चालते. महत्वाची बाब म्हणजे हे दगड जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण सरकतात तेव्हा एक खूणही सोडतात.
1972 साली या रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. त्यासाठी वैज्ञानिकांचं एक विशेष पथकही इथं आलं होतं. या दगडांवर त्यांनी तब्बल सात वर्ष संशोधन केलं. त्याच काळात 317 किलोग्रॅमच्या एका दगडाचा विशेष अभ्यास करण्यात आला. तेव्हा तो दगड अजिबात हलला नव्हता.
मात्र त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा वैज्ञानिकांनी पुन्हा या दगडाचा तिथे जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा दगड मूळ जागेवरुन एक किलोमीटर लांब अंतरावर सापडला. साहजिकच शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले. मात्र तरीही हे दगड मूळ जागेवरुन कसे हलतात किंवा घसरतात याबद्दल काहीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे हलणाऱ्या दगडांच्या या जागेचं रहस्य कायम आहे.