1969 मध्ये पाठवलेले पत्र, 2023 मध्ये पोहोचले पत्त्यावर; पत्रात काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:21 PM2023-07-21T17:21:27+5:302023-07-21T17:21:59+5:30

54 वर्षांपूर्वी 15 मार्च 1969 रोजी पत्र पाठवले होते.

A letter sent in 1969, reached in 2023; What in the letter... | 1969 मध्ये पाठवलेले पत्र, 2023 मध्ये पोहोचले पत्त्यावर; पत्रात काय...

1969 मध्ये पाठवलेले पत्र, 2023 मध्ये पोहोचले पत्त्यावर; पत्रात काय...

googlenewsNext


तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, आज फार फार क्वचित लोक पत्र किंवा पोस्टकार्ड पाठवत असतील. परंतु, पूर्वी पत्र किंवा पोस्टकार्ड संवादाचे सर्वात प्रमुख आणि महत्वाच्या माध्यमांपैकी एक होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रिणींना पोस्टकार्ड पाठवायचे. कधी पोस्टकार्ड वेळेवर पोहोचायचे, तर कधी खूप उशीर व्हायचा. अशाच एका प्रकरणात एक पोस्टकार्ड चक्क 54 वर्षांनंतर दिलेल्या पत्त्यावर पोहोचले आहे. 

फेसबूक युजर जेसिका मीन्सने याबाबत माहिती दिली आहे. तिने तिच्या पत्त्यावर आलेले पोस्टकार्डचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत लिहिले की, "हे गुपित सोडवण्यासाठी मला मदत करा. ही पोस्ट पुन्हा-पुन्हा शेअर करा. मला हे जाणून घ्यायला आवडेल की, अनेक दशकांनंतर हे कसे पोहोचले. कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला याची माहिती असेल की, 2023 मध्ये टल्लाहसीमधून हे पोस्टकार्ड कुणी पाठवले.”

ती पुढे म्हणते, "हे पोस्टकार्ड आज माझ्या घरी आले. यावर, मिस्टर आणि मिसेस रेने गॅग्नॉन लिहिले आहे. हे पोस्टकार्ड 15 मार्च 1969 रोजी पॅरिसमधून पोस्ट केले गेले होते. याला दिलेल्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी 54 वर्षे लागली. यात 12 जुलै 2023 तारखेचे Tallahassee, Florida चे नवीन पोस्टमार्क आहे. हे कार्ड पॅरिसवरुन टल्लाहसीला कसे पोहोचले?"

पोस्टकार्डमध्ये काय लिहिले आहे?
पोस्टकार्डवर लिहिले की, "प्रियजणांनो, तुम्हाला हे कार्ड मिळेपर्यंत मी घरी पोहोचेन. मी आता जिथे आहे तिथे टूर आयफेलवरुन हे पाठवतोय. खूप काही पाहण्याची संधी मिळाली नाही, पण मी त्याचा आनंद घेत आहे. ही पोस्ट दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: A letter sent in 1969, reached in 2023; What in the letter...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.