बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:56 IST2025-11-03T16:55:38+5:302025-11-03T16:56:22+5:30
या कलाकृतीला अमेरिका असं नाव देण्यात आले आहे. Maurizio Cattelan या इटालियन कलाकाराने तयार केलेली आहे.

बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
सध्या सोशल मीडियावर एक टॉयलेट सीट चर्चेचा विषय बनली आहे. यामागचं कारण म्हणजे याची किंमत जवळपास ८८ कोटी इतकी असल्याचं सांगितले जाते. इटलीतील प्रसिद्ध कलाकार मॉरिजियो कॅटेलन यांनी १८ कॅरेट शुद्ध सोन्याने बनवलेल्या या टॉयलेट सीटचा १८ नोव्हेंबरला न्यूयॉर्क येथील सोटबी येथे लिलाव होणार आहे. ही सीट खास कलाकाराने बनवली आहे ज्याचे वजन २२३ पाउंड आहे. याची सुरुवातीला बोली १० मिलियन डॉलर म्हणजे ८८ कोटी इतकी आहे. ही बोली आणखीही वर जाऊ शकते असं बोलले जाते.
सोन्याचं सिंहासन असा फिल देणारी ही टॉयलेट सीट ८ नोव्हेंबरला सोटबीच्या नवीन मुख्यालयाच्या बिल्डिंगमधील बाथरूममध्ये प्रदर्शित केली जाईल. याआधी ही टॉयलेट सीट गगनहाइम म्युझियममध्ये सर्वसामान्यांच्या वापरासाठी ठेवली होती. या टॉयलेट सीटवर अद्याप कुणीही बसले नाही. हे सोन्याचे टॉयलेट पहिल्यांदा २०१६ मध्ये न्यू यॉर्कच्या गुगेनहाइम संग्रहालयात बसवण्यात आले होते. अनेक टीकाकारांनी त्याची तुलना दादा चळवळीतील कलाकार मार्सेल डचॅम्प यांच्या १९१७ च्या पोर्सिलेन युरिनल "फाउंटन" शी केली. ते पाहण्यासाठी आणि वापरण्यासाठी जवळजवळ १ लाख लोक रांगेत उभे होते.
या कलाकृतीला अमेरिका असं नाव देण्यात आले आहे. Maurizio Cattelan या इटालियन कलाकाराने तयार केलेली आहे. त्यात १०१ किलो सोनं वापरले गेले आहे. श्रीमंत असो की गरीब, सोन्याचे टॉयलेट असो की मातीचे – शेवटी सर्वांना एकच जागा लागते. दिखावा कशाला? ही कलाकृती अमेरिकेच्या अतिरेकी श्रीमंती, राजकारण आणि कला बाजाराच्या वेडेपणावर टीका करते असं कॅटेलन यांनी म्हटलं होते. २०१९ साली ब्लेनहाइम पॅलेसमध्ये अशाच प्रकारची एक टॉयलेट सीट ठेवली होती जी कालांतराने चोरीला गेली.