तरूणांनाही लाजवेल अशी आहे या ७२ वर्षीय व्यक्तीची बॉडी, फोटो बघाल तर बघतच रहाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 13:05 IST2021-07-22T12:59:07+5:302021-07-22T13:05:27+5:30

काही व्यक्तिमत्वे असतातच अशी की त्यांना पाहुन त्यांच्या वयाची कल्पनाच येत नाही. असेच एक बॉडी बिल्डर आजोबा ७२ वर्षाचे आहेत पण जेव्हा तुम्हा यांना पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ते फक्त ३० वर्षांचे आहेत. बसला ना धक्का? 

72 year old body builder looks like 30 year. Age is just a number | तरूणांनाही लाजवेल अशी आहे या ७२ वर्षीय व्यक्तीची बॉडी, फोटो बघाल तर बघतच रहाल....

तरूणांनाही लाजवेल अशी आहे या ७२ वर्षीय व्यक्तीची बॉडी, फोटो बघाल तर बघतच रहाल....

अनेकजण ३० च्या वयातही ७० वर्षाचे दिसतात तर काहीजण ७०च्या वयातही ३० वर्षाचे दिसू शकतात. आपण आपल्याला किती फिट अँड फाईन ठेवतो यावर आपले आरोग्य अवलंबुन आहे. तुमचे आरोग्य उत्तम असेल तर ते तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये झळकते. काही व्यक्तिमत्वे असतातच अशी की त्यांना पाहुन त्यांच्या वयाची कल्पनाच येत नाही. असेच एक बॉडी बिल्डर (bodybuilder) आजोबा ७२ वर्षाचे आहेत पण जेव्हा तुम्हा यांना पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ते फक्त ३० वर्षांचे आहेत. बसला ना धक्का? 



जिमीन यांग (ximin yang) असे या आजोबांचे नाव असून ते चीनमध्ये राहतात. १९८४ मध्ये त्यांनी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली. हे पहिलं वर्ष होतं जेव्हा १९५३ नंतर चीनने बंद केलेली बॉडी बिल्डिंग स्पर्धा (bodybuilding competition) पुन्हा सुरु केली होती.

तब्बल ३० वर्ष त्यांनी वर्कआऊट करून ही बॉडी बनवली आहे. २०१९मध्ये त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते स्वत: ला ३० वर्षाचं असल्याचं सांगत होते आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसला होता. चेंज प्रॉडक्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की फक्त बॉडीबिल्डिंगमुळे ते कित्येक वर्ष अस हेल्दी (healthy)जीवन जगत आहेत आणि त्याचा ते आदर करतात. ७२ वर्षाचे असूनही त्यांना कोणताही आजार नाही. ते कोणत्याही तरुणाला लाजवतील इतके फीट आहेत.

Web Title: 72 year old body builder looks like 30 year. Age is just a number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.