शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अबब! नर्मदा नदीत आढळला ७ किलोचा तरंगता दगड; हा चमत्कार नव्हे तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 08:16 IST

देरोली गावातील युवक मासेमारीसाठी त्याची बोट घेऊन नर्मदा नदीत गेला होता. त्याला पाण्यात तरंगती वस्तू दिसली.

वडोदरा (गुजरात) : वडोदराजवळ देरोली गावाजवळून वाहणाऱ्या नर्मदा नदीत जवळपास ७ किलो वजनाचा दगड आढळला असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात बुडत नाही. स्थानिक लोकांची श्रद्धा हा दगड रामसेतूतून तुटून वाहत गावात आला असावा अशी आहे. वैज्ञानिक तथ्यानुसार तरंगता दगड ही सामान्य बाब आहे.

देरोली गावातील युवक मासेमारीसाठी त्याची बोट घेऊन नर्मदा नदीत गेला होता. त्याला पाण्यात तरंगती वस्तू दिसली. सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काम संपवून तो नदीच्या त्या जागी आला तेव्हाही ती वस्तू तरंगतच होती. त्याने ती वस्तू बाहेर काढून पाहिली तर तो तरंगणारा दगड होता. त्याला त्याचे आश्चर्य वाटले. त्याने तो दगड आणला व लोकांना दाखवला. त्यांनाही आश्चर्य वाटले. 

चमत्कार नाहीएम. एस. विद्यापीठाचे निवृत्त प्रोफेसर के. सी. तिवारी म्हणाले की, “काही विशिष्ट प्रकारचे दगड तरंगणे ही सामान्य बाब आहे. काही कोरल्स स्टोन, चुन्याचे किंवा ज्वालामुखीतून निघालेले दगड वजनदार तर असतात, पण त्यांच्यात जी कमी घनता असते त्यामुळे ते पाण्यात हलके राहतात. यामुळे आणि त्यांच्यातील छिद्रांत हवा भरल्यामुळे हे दगड पाण्यात तरंगतात. यात कोणताही चमत्कार नाही.” 

टॅग्स :riverनदी