आयुष्यभर पुरूष बनून राहिली ही व्यक्ती, पोटात दुखणं उठल्यावर हॉस्पिटलमध्ये झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:27 PM2022-01-24T12:27:14+5:302022-01-24T12:30:01+5:30

Kosovo : या व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागलं होतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांना आधी  वाटलं की त्याला हर्नियाची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

67 year old man found female reproductive organ in body Kosovo | आयुष्यभर पुरूष बनून राहिली ही व्यक्ती, पोटात दुखणं उठल्यावर हॉस्पिटलमध्ये झाला मोठा खुलासा

आयुष्यभर पुरूष बनून राहिली ही व्यक्ती, पोटात दुखणं उठल्यावर हॉस्पिटलमध्ये झाला मोठा खुलासा

Next

कोसोवाचा (Kosovo) राहणाऱ्या एका व्यक्तीच्या उपचारा दरम्यान डॉक्टर हैराण झाले. कारण या व्यक्तीच्या शरीरात स्त्री आणि पुरूष दोन्हीचे प्रजनन अवयव आढळून आले. हैराण करणारी बाब म्हणजे ही ६७ वर्षीय व्यक्ती ३ मुलांचा पिता आहे. या व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागलं होतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांना आधी  वाटलं की त्याला हर्नियाची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला, पण ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना ओवरी, फॅलोपियन ट्यूब आणि गर्भाशय दिसून आलं. जे बघून डॉक्टर हैराण झाले.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, व्यक्तीच्या शरीरात पुरूष आणि महिलांचे अवयव आहेत. पण त्याचं शरीर बाहेरून पुरूषाचं दिसतं आणि त्याच्या पाठीवर व पोटावर फुगीर भाग होता. जे बघून असं वाटत होतं की, व्यक्तीला हर्निया आहे. पण नंतर समजलं की, त्याला समस्या महिलांच्या अवयवामुळे होत आहे.

डॉक्टर म्हणाले की, ही व्यक्ती आयुष्यभर पुरूष बनून जगली. दरम्यान ज्या लोकांमध्ये जन्मापासून स्त्री आणि पुरूषांचे अवयव आढळला ते सामान्यपणे निकामी असतात. या केसमुळे डॉक्टरही हैराण आहेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, रूग्णामध्ये केवळ अंडकोष होता, पण त्याला त्याच्या जीवनात काही खास समस्या झाली नाही. रिपोर्टनुसार, सध्या जी प्रॅक्टिस फॉलो केली जाते ती ही की, डॉक्टर्स जन्मावेळी एक अवयव काढून टाकतात. अनेक लोक याबाबत वेगळा विचार करतात. त्यांचं मत आहे की, अशा लोकांवरच सोडून द्यावं की, त्यांना कोणत्या पर्सनॅलिटीसोबत जगायचं आहे. त्यानंतरच त्यांनी ऑपरेशन करावं.

हे पण वाचा :

RRR सिनेमाची स्टोरी खोटी समजू नका, 'ते' दोन शूर क्रांतिकारी खरंच होऊन गेलेत!
 

Web Title: 67 year old man found female reproductive organ in body Kosovo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.