शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसारखे स्कर्ट-हाय हील्स घालून ऑफिसला जातो, कारण वाचून तुम्हीही म्हणाला शाब्बास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 17:38 IST

महत्वाची बाब म्हणजे मार्कची आतापर्यंत 3 लग्ने झाली आहेत. सध्या ज्या पत्नीसोबत तो राहतो तिच्यासोबत तो 11 वर्षांपासून आहे.

महिला आणि पुरूषांचे कपडे वेगवेगळे असतात. आजकाल एकावेळी महिलांनी पुरूषांचे कपडे घातले तर चांगलं दिसेल, पण पुरूषांनी जर महिलांचे कपडे घातले तर? नक्कीच त्यांची खिल्ली उडवली जाणार. पण अमेरिकेत एक अशी व्यक्ती आहे जो एक सीनिअर सिटीजन आहे. तरीही महिलांचे कपडे घालून चक्क ऑफिसला जातो. ही व्यक्ती हाय हील्स आणि स्कर्ट घालून ऑफिसला जातो.

61 वर्षीय या व्यक्तीचं नाव मार्क ब्रायन (Mark Bryan) आहे आणि तो एक रोबोटिक इंजिनिअर आहे तो सध्या जर्मनीमध्ये राहतो. इन्स्टावर त्याला 6 लाख लोक फॉलो करतात. यावर त्याने स्वत:ला स्ट्रेट असल्याचं सांगितलं. म्हणजे तो एक पुरूष आणि त्याला महिला आवडतात.

सीक्रेट लाइफ ऑफ मॉम वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, त्याचा हा पेहराव बघून लोक त्याला समलैंगिक समजतात. कारण तो कपडे महिलांसारखे घालतो. इतकंच नाही तर हाय हील्सही घालतो. 

महत्वाची बाब म्हणजे मार्कची आतापर्यंत 3 लग्ने झाली आहेत. सध्या ज्या पत्नीसोबत तो राहतो तिच्यासोबत तो 11 वर्षांपासून आहे. या लग्नांमधून त्याला 3 मुलं आहेत आणि ते सुद्धा त्याच्या या पेहरावाला सपोर्ट करतात. 

पहिल्यांदा त्याने स्कर्ट आणि हील कॉलेजमध्ये असताना घातले होते. तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला म्हटलं होतं की, जर त्याला तिच्यासोबत डान्स करायचा आहे तर स्कर्ट आणि हील घालूनच करावा लागेल. आता सीनिअर सिटीजन झाल्यावरही तो गेल्या 4 वर्षापासून हेच कपडे घालून ऑफिसला जातो.

असं करण्याचं कारण

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, तो असं का करत आहे? यावर त्याचं मत आहे की, कपड्यांमध्ये भेदभाव केला जाऊ नये. हे केवळ मनुष्यांच्या पसंत-नापसंतीवर अवलंबून असायला हवेत. लिंगानुसार नाही. 

त्याचं मत आहे की, त्याला लोकांच्या मनातील हा समज दूर करायचा आहे की, काही कपडे केवळ महिलांचे आहे आणि काही कपडे पुरूषांचे. तो म्हणतो की, जेव्हा तो एखाद्या महिलेला रस्त्यावर पेंसिल स्कर्ट आणि हीलमध्ये बघतो तेव्हा त्याला ती महिला शक्तीशाली बिझनेसवुमन वाटते. तिची प्रतिमा फार पावरफुल वाटते. त्यालाही तेच करायचं आहे.

(Image Credit : Instagram/markbryan911)

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल