६ वय असताना किडनॅप झालेला मुलगा ७० वर्षांनी घरी परतला, पुतणीने 'असा' घेतला शोध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:28 IST2024-09-24T13:26:46+5:302024-09-24T13:28:58+5:30
लुईस त्याच्या मोठा भाऊ रोजरसोबत गार्डनमध्ये खेळत होता. तेव्हाच एका महिलेने चॉकलेटचं आमिष दाखवून लुईस अल्बिनोला आपल्यासोबत घेऊन गेली.

६ वय असताना किडनॅप झालेला मुलगा ७० वर्षांनी घरी परतला, पुतणीने 'असा' घेतला शोध!
कॅलिफोर्नियामध्ये किडनॅप झालेला एका मुलगा तब्बल ७० वर्षांनी आपल्या परिवाराला भेटला. ६ वर्षाचा असताना किडनॅप झालेला हा मुलगा अमेरिकेच्या ईस्टा कोस्टमध्ये सापडला. असं सांगण्यात आलं की, २१ फेब्रुवारी १९५१ ला लुईस अरमांडो अल्बिनो कॅलिफोर्नियाच्या वेस्ट ऑकलॅंड पार्कमधून बेपत्ता झाला होता. लुईस त्याचा मोठा भाऊ रोजरसोबत गार्डनमध्ये खेळत होता. तेव्हाच एका महिलेने चॉकलेटचं आमिष दाखवून लुईस अल्बिनोला आपल्यासोबत घेऊन गेली.
महिलेने हा मुलगा एका परिवाराला दिला आणि त्यानंतर त्या परिवाराने त्याला आपल्या मुलासारखं वाढवलं. इतके वर्ष त्याला त्याची खरी ओळख माहीत नव्हती. आता ते एक निवृत्त फायर फायटर आहेत. अनेकवर्ष त्यांची काहीच माहिती मिळाली नाही. मात्र, यावर्षी परिवाराच्या मेहनतीने आणि एका डीएनए टेस्टमुळे त्यांचा पत्ता लागला.
पुतणीने घेतला काकाचा शोध
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुईस अल्बिनोची पुतणी एलिडा एलेक्विन तिच्या काकाचा अनेक वर्षापासून शोध घेत होती. डीएनए टेस्ट, न्यूज पेपर कटींग, ऑकलॅंड पोलीस विभाग, एफबीआय आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या मदतीने ६३ वर्षीय लुईस यांचा शोध तिने घेतला.
याचवर्षी जूनमध्ये लुईस अल्बिनो आपल्या पूर्ण परिवाराला भेटले. यावेळी घरातील सगळे सदस्य भावूक झाले होते. लुईस यांनी मोठा भाऊ रोजर यांचीही भेट घेतली. त्यांचं गेल्याच महिन्यात कॅन्सरने निधन झालं. पुतणी एलिडा म्हणाली की, दोन भावांची भेट फारच भावूक करणारी होती. ती म्हणाली की, "त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि बराच वेळ एकमेकांना सोडलं नाही. ते बसले आणि खूप गप्पा केल्या".