बाबो! ६ टन वजनाच्या 'बटाट्यात' एक रात्र राहण्यासाठी लोक देताहेत १८ हजार रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:00 IST2019-04-25T16:53:19+5:302019-04-25T17:00:18+5:30
बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ आपण सगळेच आवडीने खातो. भाज्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय जर कोणती भाजी असेल तर ती बटाट्याची.

बाबो! ६ टन वजनाच्या 'बटाट्यात' एक रात्र राहण्यासाठी लोक देताहेत १८ हजार रुपये!
बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ आपण सगळेच आवडीने खातो. भाज्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय जर कोणती भाजी असेल तर ती बटाट्याची. बटाट्याची ही लोकप्रियता पाहून बटाटा फॅनसाठी एक भन्नाट आयडियाची कल्पना समोर आणली गेली आहे. अमेरिकेतील इदाहोमध्ये एक विशाल 'बटाटा' आहे, ज्यात एक रात्र राहण्यासाठी लोक २०० डॉलर म्हणजेच १४ हजार रुपये खर्च करत आहेत. हा 'बटाटा' आतून एखाद्या लक्झुरिअस हॉटेलसारखा आहे.
बिग इदाहो पोटॅटो हॉटेल'
Airbnb या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, तुम्हीही या हॉटेलचं बुकिंग करु शकता. हा बटाटा सहा टनाचा आहे. याला बटाट्याची निर्मिती स्टील, प्लाटर आणि कॉंक्रिटपासून करण्यात आली आहे. एकदा या 'बटाट्यात' शिरल्यावर तुम्ही बघतच रहाल इतका तो सुंदर आहे.
या 'बटाट्यात' दोन लोक आरामात राहू शकतात. म्हणजे खास व्यक्तीसोबत लोक इथे जाऊ शकतात. या 'बटाट्यात' लोकांना एक छोटं बाथरुम, किचन, आग पेटवण्यासाठी जागा आहे. तसेच यात एअर कंडिशनरही लावण्यात आला आहे.
तसे बटाटे घ्यायला आपण बाजारात गेलो तर फार जास्त पैसे त्यासाठी द्यावे लागत नाहीत. पण 'बटाटा' हॉटेलमध्ये एक रात्र राहणं चांगलंच महागात पडू शकतं. कारण एक रात्र इथे राहण्यासाठी तुम्हाला २०० डॉलर इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. यावरुन तुम्हाला आणखी ३१ डॉलर सर्व्हिस टॅक्स आणि १६ डॉलर ऑक्यूपेंसी टॅक्स द्यावा लागेल. एकूण हा खर्च होईल २४७ डॉलर म्हणजेच १८००० हजार रुपये. मग काय विचार आहे जाणार का या 'बटाट्यात' राहण्यासाठी?