सिनेमा पाहायला गेलेले ४०० लोक घरी परतलेच नाहीत, जाणून घ्या काय घडलं त्या सिमेमागृहात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 05:59 PM2022-08-19T17:59:08+5:302022-08-19T17:59:29+5:30

कुणी आपला मुलगा गमावला, कुणी पती, कुणी मित्र तर काहींची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मी तीन तासांत परत येईन, असं घरी सांगून निघालेले ते कधीच परतले नाहीत.

400 people died while watching film as theater caught fire | सिनेमा पाहायला गेलेले ४०० लोक घरी परतलेच नाहीत, जाणून घ्या काय घडलं त्या सिमेमागृहात?

सिनेमा पाहायला गेलेले ४०० लोक घरी परतलेच नाहीत, जाणून घ्या काय घडलं त्या सिमेमागृहात?

Next

सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम आहे. आपण वेळ घालवण्यासाठी, विरंगुळा म्हणून चित्रपट बघायला जातो. दोन-तीन तास चित्रपट पाहायचा नंतर कुठेतरी फिरायला जायचं, असे प्लॅन करून आपण घरातून निघतो. 1978 साली 300 प्रेक्षक एक चित्रपट पाहायला गेले होते. त्यांचेही असे काहीसे प्लॅन असतील. पण ते प्लॅन अपूर्णच राहिले, त्याचं कारण म्हणजे ते त्या थिएटरच्या बाहेर पडूच शकले नाहीत. त्यादिवशी त्या थिएटरमध्ये असणाऱ्या प्रेक्षकांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचले. कुणी आपला मुलगा गमावला, कुणी पती, कुणी मित्र तर काहींची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मी तीन तासांत परत येईन, असं घरी सांगून निघालेले ते कधीच परतले नाहीत.

19 ऑगस्ट 1978 रोजी 377 ते 470 जणांना दहशतवाद्यांनी आगीच्या भक्ष्यस्थानी दिलं होतं. इराणच्या इतिहासात कट्टरतावादी आणि दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्याने जग हादरलं होतं. एका थिएटरमध्ये 400 हून अधिक लोक चित्रपट पाहत असताना त्या थिएटरला आग लावली गेली. 19 ऑगस्ट रोजी इराणमधील अबादान येथील सिनेमा रेक्समध्ये शेकडो प्रेक्षक ‘द डीअर (गवाझ्न्हा); हा चित्रपट पाहत होते. त्यावेळी 08:21 मिनिटांनी चार दहशतवादी आले आणि त्यांनी थिएटरचे दरवाजे बंद केले. एका कॅनमधून थिएटरमध्ये पेट्रोल ओतलं आणि थिएटरला आग लावली. नंतर या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. इराणच्या इतिहासातील ही सर्वांत दुर्दैवी घटना आहे. ही घटना घडल्यानंतर इराणची राजधानी तेहरान तसंच इतर अनेक शहरांतील थिएटर मालकांनी आपली थिएटर्स बंद करून आंदोलनं केली. या घटनेनंतर विरोध इतका तीव्र झाला की नेत्यांची खुर्चीही धोक्यात आली.

देशाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने आग लागल्याच्या 13 तासांनंतर रिपोर्ट दिला आणि तोडफोड करणाऱ्या आणि अज्ञात निदर्शकांना दोषी ठरवलं. निम्मे प्रेक्षक थिएटर बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्या घटनेतून जवळपास 100 जण वाचले आणि 223 लोक भाजले तसेच जखमी झाले. बाकीचे चेंगराचेंगरीत मारले गेले, काही गुदमरून मेले तर काही जिवंत जळाले, अशी माहिती तेहरानच्या वृत्तपत्रांनी दिली.

तत्कालीन पंतप्रधान जमशेद अमौजेगर यांनी या आगीला 'राष्ट्रीय आपत्ती' म्हणत पीडितांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. या घटनेस जबाबदार असलेल्यांची नेमकी ओळख सांगण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिला, परंतु संतप्त आंदोलकांनी दहशतवादी मुस्लिमांना (Muslim) दोषी ठरवलं. इराणच्या अधिकृत रेडिओने या गुन्हेगारांचं दहशतवादी असं वर्णन केलं. तसंच प्रकरणात अनेक संशयितांना अटक करण्यात आल्याचं वृत्त त्यांनी अबादान पोलीस प्रमुखांच्या हवाल्याने दिलं होतं. पण याशिवाय इतर कोणतीही माहिती दिली नव्हती. मद्यधुंद अवस्थेत सापडलेला थिएटरचा व्यवस्थापक आणि चौकीदार यांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त वृत्तपत्रांनी दिलं होतं; पण आजतागायत या दहशतवादी कृत्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.अबादानमध्ये आग लागल्याच्या काही तासांनंतर, दक्षिण इराणच्या शिराझ शहरात दुसऱ्या एका थिएटर आणि रेस्टॉरंटला आग लावण्यात आली होती. या आगीत तीन लोक जखमी झाले होते. याशिवाय तेहरानमध्ये एका रेस्टॉरंटलाही आग लावण्यात आली होती.

Web Title: 400 people died while watching film as theater caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.