धक्कादायक! डोक्यात घुसलेल्या चाकूसोबत तो रस्त्यावर फिरत होता, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 14:56 IST2020-06-25T14:39:22+5:302020-06-25T14:56:43+5:30
एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय, ज्यात एक व्यक्तीच्या डोक्यात चाकू घुसलेला होता, त्याचं रक्त वाहत होतं.

धक्कादायक! डोक्यात घुसलेल्या चाकूसोबत तो रस्त्यावर फिरत होता, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
सध्या कोरोना व्हायरसं थैमान सुरूच आहे. अशात जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक विचित्र घटनाही समोर येत आहेत. दरम्यान एक धक्कादायक घटना अमेरिकेतील न्यूयॉर्क जवळच्या हरलेम शहरातून समोर आली आहे. येथील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय, ज्यात एक व्यक्तीच्या डोक्यात चाकू घुसलेला होता, त्याचं रक्त वाहत होतं आणि तो आरामात रस्त्यावर फिरत होता.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हरलेम शहरातील एका रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. इथे रस्त्यावर एक 37 वर्षीय व्यक्ती फिरत होती, ज्याच्या डोक्यात चाकू घुसलेला होता. हा भीतीदायक नजारा पाहून अनेक लोक घाबरले.
या व्यक्तीसोबत एक महिला सुद्धा होती. या महिलेचा हल्लेखोरांसोबत वाद झाला होता. हल्लेखोर चारपेक्षा जास्त होते आणि महिलेची पर्स घेऊन पळत होते. महिलेच्या पर्समध्ये सेलफोन, औषधं आणि बेनिफिट कार्ड होतं.
जखमी व्यक्ती महिलेची मदत करण्यासाठी पुढे आला होता. पण हल्लेखोरांनी काही कळण्याच्या आत त्याच्या डोक्यात चाकू मारला आणि ते पळू गेले. त्यानंतर जखमी व्यक्ती आणि महिला अॅम्बूलन्सची वाट बघत होते. दरम्यान ही व्यक्ती इकडे तिकडे फिरत होती.
येथून येणारे जाणारे लोक या व्यक्तीला कॅमेरात कैद करत होते. पण कुणीही त्याच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पुढे काय झालं याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण एका महिलेची मदत करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला कुणीही पुढे येऊ नये हे फार दुर्दैवी आहे.
दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....
बाबो! माशांऐवजी जाळ्यात 'जे' अडकलं ते पाहून हैराण झाले मच्छिमार, 230 कोटी रूपये आहे याची किंमत...