(Image Credit : DailyMail)

नेहमी तरूण दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी लोक पैसा पाण्यासारखा खर्च करतात. पण चीनमध्ये एक अशी व्यक्ती आहे, ज्याचं वय ३४ आहे. पण तरी ती व्यक्ती एखाद्या १३-१४ वर्षांच्या मुलासारखी दिसते. सामान्यपणे लोक तरूण दिसण्यासाठी आतुर झालेले असतात, पण ही व्यक्ती तरूण होऊनही वयानुसार तरूणासारखी दिसू शकत नाही.

या व्यक्तीचं नाव आहे झू शेंगकाई आणि तो राहतो चीनच्या वुहानमध्ये. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ना मिशी आहे ना दाढी आहे. इतकेच काय तर त्यांचा आवाजही एका लहान मुलासारखा आहे. त्यामुळे जे लोक त्याला ओळखत नाही, ते त्याला पाहून लहान मुलगाच समजतात.

आता झू या गोष्टीने परेशान आहे की, त्याच्या वयाच्या जवळपास सर्वच मित्रांचं वय लग्नाचं झालं आहे. पण शरीराचा विकास न झाल्याने तो लग्न करू शकत नाही. त्यामुळे तो या गोष्टी एका अभिशापही मानतो. झू हा सहा वर्षांचा असताना त्याच्या डोक्याला जखम झाली होती. त्यावेळी त्याच्या डोक्यातून रक्त तर आलं नव्हतं. पण त्याला ताप आला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी टेस्ट केल्यावर सांगितलं की, झू च्या डोक्यात रक्ताची गाठ तयार झाली आहे. 

नंतर डॉक्टरांनी सर्जरीच्या माध्यमातून त्याच्या डोक्यातील रक्ताची गाठ काढून टाकली होती. तेव्हा सगळं काही ठीक होईल असं त्याला वाटलं होतं. पण तो ९ वर्षांचा झाल्यावर त्याच्या आई-वडिलांच्या असं लक्षात आलं की, त्याचं वय वाढतंय, पण त्यानुसार शरीराची वाढ होत नाहीये. 

त्यानंतर पुन्हा एकदा त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी अनेक प्रकारच्या टेस्ट केल्या आणि सांगितले की झू च्या पीयूषिका ग्रंथीचं नुकसान झालं आहे. त्यामुळेच वयानुसार त्याचा चेहरा आणि शरीराची वाढ झाली नाही.

सध्या झू हा त्याचं पोट भरण्यासाठी एक सलून चालवतो. तो त्याच्यासोबत झालेल्या समस्येने हैराण नक्कीच आहे. पण कधी कधी गंमतीने म्हणतो की, एक दिवस त्याच्या सर्वच मित्रांच्या चेहऱ्या सुरकुत्या पडतील. पण तो तेव्हाही एका लहान मुलासारखा दिसणार.

Web Title: 34 year old man look like a child because of a head injury in china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.