बोंबला! साडे चार तासांचा प्रवास करून समुद्रामार्गे गर्लफ्रेन्डला भेटायला गेला अन् थेट तुरूंगातच पोहोचला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 13:46 IST2020-12-17T13:44:24+5:302020-12-17T13:46:52+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, डेलने याआधी कधीही वॉटर स्कूटर चालवली नव्हती. पण गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी त्याने 'जेट स्की' च्या माध्यमातून आयरिश समुद्र पार केला.

बोंबला! साडे चार तासांचा प्रवास करून समुद्रामार्गे गर्लफ्रेन्डला भेटायला गेला अन् थेट तुरूंगातच पोहोचला!
असे म्हणतात की, प्रेम आणि युद्धात सगळंच माफ असतं. ही गोष्टी अनेकदा खोटीही ठरते. विश्वास बसत नसेल तर स्कॉटलॅंडच्या या व्यक्तीची कहाणी जाणून घ्या. २८ वर्षीय डेल मॅक्लॉफलिन आपल्या गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी शुक्रवारी ४० किलोमीटरचा प्रवास करून इथल ऑफ व्हिटोर्नहून रॅमसे पोहोचला. या प्रवासात त्याला साडे चार तासांचा वेळ लागला. पण कोरोना महापारीच्या नियमामुळे या प्रियकराला तुरूंगात जावं लागलं.
मीडिया रिपोर्टनुसार, डेलने याआधी कधीही वॉटर स्कूटर चालवली नव्हती. पण गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी त्याने 'जेट स्की' च्या माध्यमातून आयरिश समुद्र पार केला. या व्यक्तीने हे मान्य केलं की, तो बेकायदेशीरपणे आयलॅंडवर गेला. त्यानंतर त्याला चार आठवड्यांची तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. आइसलॅंडच्या कायद्यांनुसार, केवळ स्पेशल परमिशनच्या आधारेच नॉन-रेसीडेंट्स लोक आइल ऑफ मॅनमध्ये दाखल होऊ शकतात.
२५ किलोमीटर पायी पण चालला
प्रॉसिक्युटरने सांगितले की, डेलने वाहन खरेदी केलं आणि साधारण ४० किलोमीटरच्या प्रवासावर निघाला. त्याला अपेक्षा होती की, तो हा प्रवास ४० मिनिटांमध्ये पूर्ण करेल. पण दुपारी १ वाजता रॅमेस पोहोचल्यावर त्याला डगलसमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेन्डच्या घरी पोहोचायला २५ किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला.
प्रेयसीसोबत गेला नाइटक्लबला
तो तिथे पोहोचल्यावर दोघेही नाइटक्लबला गेले होते. तिथे त्याने त्याची खोटी ओळख सांगितली होती. पण चौकशी केल्यावर त्याने मान्य केलं की, तो बेकायदेशीरपणे तिथे आलाय. रविवारी डेलला पोलिसांनी अटक केली. याआधी डेलला सप्टेंबरमध्ये या बेटावर छोटं-मोठं काम करण्यासाठी ४ आठवडे राहण्याची परवानगी दिली गेली होती. तेव्हा १४ दिवस आयसोलेट राहिल्यानंतर तो एक दिवस आपल्या गर्लफ्रेन्डला भेटला होता.
डेलवर आरोप आहे की त्याने मुद्दामहून आयलॅंडवरील कायदे तोडण्याचा प्रयत्न केला आणि कोरोना महामारीच्या काळात इथे राहणाऱ्या लोकांसाठी धोका वाढवण्याचं काम केलं. तर यावर डेलचा वकिल म्हणाला होता की, तो डिप्रेशनमध्ये होता आणि याच कारणाने त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डला भेटायचं होतं.