आपले पुर्वज शौचाला कुठे जायचे? सापडलं २७ हजार वर्षांपुर्वीचं टॉयलेट, पाहुन म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 05:11 PM2021-10-10T17:11:03+5:302021-10-10T17:14:33+5:30

काही हजार वर्षांपूर्वी सगळेच नागरिक उघड्यावर शौच करत असावेत, असं वाटण्याची शक्यता आहे. मात्र हे खरं नाही. इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये एका पुरातन टॉयलेट सापडलं आहे.

27 thousand year old toilet found in Jerusalem | आपले पुर्वज शौचाला कुठे जायचे? सापडलं २७ हजार वर्षांपुर्वीचं टॉयलेट, पाहुन म्हणाल...

आपले पुर्वज शौचाला कुठे जायचे? सापडलं २७ हजार वर्षांपुर्वीचं टॉयलेट, पाहुन म्हणाल...

Next

सध्या जगभरात इंडियन (Indian toilet) आणि वेस्टर्न हे टॉयलेटचे (Western toilet) दोनच प्रकार माहित आहेत. मात्र आजही अनेक ठिकाणी नागरिक शेतात किंवा मोकळ्या मैदानावर शौचासाठी जातात. त्यामुळे काही हजार वर्षांपूर्वी सगळेच नागरिक उघड्यावर शौच करत असावेत, असं वाटण्याची शक्यता आहे. मात्र हे खरं नाही. इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये एका पुरातन टॉयलेट सापडलं आहे.

जेरुसलेम या ऐतिहासिक शहरात सतत उत्खनन सुरु असतं. वेगवेगळ्या काळातील संस्कृतींचा अभ्यास त्यातून केला जातो. या उत्खननात नुकतंच एक टॉयलेट सापडलं आहे. सुमारे २७  हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट असून ते अति श्रीमंत व्यक्तीनंच बांधलं असण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत.

२७ हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारचं टॉयलेट बांधण्यात आलं -आहे, त्यावरून ते कुणाही गरिबाला बांधणं शक्य नसल्याचं दिसतं. प्रचंड खर्च करून आणि अनेक मजुरांच्या मेहनतीनं हे टॉयलेट बांधल्याचं दिसतं. हे एक मोठं न्हाणीघर असून टॉयलेट हा त्याचाच एक भाग आहे. ज्या ठिकाणी हे टॉयलेट सापडलं तिथं एक भलीमोठी राजवाड्यासारखी इमारत होती. तिथं राहणाऱ्या एखाद्या शौकीन श्रीमंतानं हे टॉयलेट बांधलं असण्याची शक्यता आहे.

बसायला सुटसुटीत असं हे टॉयलेट असून मलमुत्र वाहून नेण्यासाठी खोल खड्डा खणल्याचं दिसतं. त्यानंतर खाली सेप्टिक टँकदेखील आढळून आला आहे. या टँकमध्ये जनावरांची हाडं आणि काही भाड्यांचं अवशेषदेखील मिळाले आहे. त्यावरून २७ हजार वर्षांपूर्वी कुठले प्राणी अस्तित्वात होते, त्यावेळची खाद्यसंस्कृती कशी होती वगैरे बाबींचा शोध घेतला जाणार आहे.

Web Title: 27 thousand year old toilet found in Jerusalem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.