2600 old mummy killed : तब्बल २६०० वर्षांआधी कुऱ्हाडीनं केली होती ममीची हत्या; समोर आला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 16:04 IST2021-04-05T15:39:10+5:302021-04-05T16:04:29+5:30
2600 old mummy killed : मृत्यूच्यावेळी या महिलेचं वय २० ते ३० असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2600 old mummy killed : तब्बल २६०० वर्षांआधी कुऱ्हाडीनं केली होती ममीची हत्या; समोर आला मोठा खुलासा
इजिप्तचं नाव घेतलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे ममी. गेल्या अनेक वर्षांपासून इजिप्तमध्ये ममीनं स्वत;चं अस्तित्व टिकवून ठेवलं असून या ममीबाबत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा होत असतो. काही दिवसांपूर्वी दीड हजार वर्ष जुन्या पेटीत बंद असलेली ममी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला होता. सध्या ममीबाबत अशीच एक माहिती समोर आली आहे.
ममीला ताकाबुती ममी असं म्हणतात. ताकाबुती ममीविषयी महत्वाची माहिती समोरी आली आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार ही एका महिलेची ममी असून पाठीत कुऱ्हाड घालून या महिलेची हत्या करण्यात आली होती. या ममीची हत्या चाकूनं करण्यात आली असावी असा खुलासा याआधीच्या संशोधनातून करण्यात आला होता. पण आता मात्र या ममीची हत्या कुऱ्हाडीनं झाल्याचं समोर येत आहे.
कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....
इजिप्तमधल्या श्रीमंत कुटुंबातील ही महिला होती. आतापर्यंत तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाही. १८३४ पासून या ममीवर संशोधन सुरू होतं. या संशोधनातून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. हत्या करण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला होता. मृत्यूच्यावेळी या महिलेचं वय २० ते ३० असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अडीच हजार वर्ष जुन्या पेटीत बंद होती ममी
इजिप्तमधील मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी प्राचीन ममीची पेटी(Ancient Mummy Coffin) उघडली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला होता. या वर्षाच्या सुरूवातील ५६ बंद पेट्या सापडल्या होत्या. त्यातील १२ पेक्षा जास्त पेट्या या साककारा मध्ये उघडण्यात आल्या होत्या. साककारा मिस्त्र येथिल विशाल, प्राचीन दफन मैदान आहे.
आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ
मिस्त्र पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार साककाराच्या पुरातत्व क्षेत्रात दफन विहिरांमध्ये ५९ लाकड्याचा पेट्यांचा शोध घेण्यात आला होता. लाकडाच्या पेट्या चांगल्या स्थितीत होत्या. या पेट्यांमध्ये प्रतिष्ठीत आणि वरिष्ठ लोकांच्या मृतदेहांचा समावेश होता. शनिवारी एक पेटी (Ancient Mummy Coffin) पहिल्यांदा उघड्यात आली होती. जवळपास २ हजार ५०० वर्षांपूर्वी ही पेटीबंद करण्यात आली होती. पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाकडून याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत एक ममी होती. एका दफन कापडात गुंडाळून ठेवण्यात आला होती.