शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध

By कुणाल गवाणकर | Published: November 19, 2020 11:09 PM

पतीसोबत एकत्र नांदताहेत तीन पत्नी; चौथ्या पत्नीचा शोध सुरू

लग्न पाहावं करून, लग्न एकदाच होतं, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. शादी ऐसा लड्डू है, जो खाये वो पछताए और ना खाए वो भी पछताए, असंही तुम्ही ऐकलं असेल. पण पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एक तरूण एकदा नव्हे, तर चौथ्यांदा लग्न बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे तो सध्या त्याच्या तीन पत्नींसह आनंदात राहतोय आणि त्याहून विशेष म्हणजे या तिन्ही पत्नी आपल्या पतीसाठी चौथ्या मुलीचा शोध घेताहेत.सियालकोटमध्ये वास्तव्यास असणारा अदनान सध्या चौथ्या विवाहासाठी मुलगी शोधतोय. अदनानचं वय सध्या २२ वर्षे आहे. वयाच्या १६ व्या वर्षी विद्यार्थी असताना त्याचा पहिला निकाह झाला. त्यानंतर चौथ्या वर्षी त्यानं पुन्हा निकाह केला. तर गेल्याच वर्षी त्यानं तिसरा निकाह केला. आता अदनान चौथ्या निकाहाच्या तयारीत आहे. त्यासाठी मुलीचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अदनानच्या तिन्ही पत्नी यामध्ये त्याला मदत करताहेत.

माझ्या तिन्ही पत्नी चौथ्या पत्नीच्या शोधासाठी प्रयत्न करत असल्याचं अदनाननं एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'माझ्या तिन्ही पत्नींची नाव 'एस'वरून सुरू होतात. चौथी पत्नीदेखील एसवरूनच नाव सुरू होणारी असेल, अशी अपेक्षा आहे,' असं अदनान म्हणाले. शुंबल, शबाना आणि शाहिदा अशी अदनान यांच्या तीन पत्नींची नावं आहेत.लग्नानंतर माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्याचं अदनान यांनी सांगितलं. 'माझा मासिक खर्च एक ते दीड लाख इतका आहे. १६ वर्षांचा असताना माझा पहिला निकाह झाला. प्रत्येक निकाहानंतर माझी आर्थिक स्थिती सुधारत गेली,' असं अदनान म्हणाले. अदनान यांच्या पत्नींची एकमेकांसोबत भांडणं होत नाहीत. त्यांचे अदनान यांच्यासोबतही वाद होत नाहीत. पण अदनान पुरेसं लक्ष देत नसल्याची तिन्ही पत्नींची तक्रार आहे. तिन्ही पत्नींनी घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.