दुसऱ्या मजल्यावर अडकला 200 किलोचा बैल, बाहेर काढण्यासाठी केले असे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 15:41 IST2021-09-05T15:37:35+5:302021-09-05T15:41:03+5:30
Bull Viral Video: राजस्थानच्या पालीमध्ये ही घटना घडली.

दुसऱ्या मजल्यावर अडकला 200 किलोचा बैल, बाहेर काढण्यासाठी केले असे प्रयत्न
नवी दिल्ली: आपल्या आजूबाजूला काही वेळा विचित्र घटना घडतात. यात अशा काही घटना असतात की, त्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास होत नाही. अशाच प्रकारची एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
राजस्थानच्या पालीमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक 200 किलोचा बैल एका घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बालकनीत अडकलेला दिसत आहे. या बैलाला क्रेनला बांधून दुसऱ्या मजल्यावरुन खाली आणले गेले. यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
https://t.co/wxF7g0baRU
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021
व्हिडिओ खूप व्हायरल होत असून, त्यावर विविध कमेंट्सही येत आहेत.#socialmedia
पावसापासून वाचण्यासाठी बैल घरात घुसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, त्या बैलाला खाली येता न आल्यामुळे पोलीस आणि मेडिकल प्रोफेशनल्सची मदत घेण्यात आली. त्यांनी त्या बैलाला खाली आणण्यासाठी एका मोठ्या क्रेनची मदत घेतली. क्रेनला बांधून त्या बैलाला खाली उतरवण्यात आले.