20 वर्षीय सावत्र आई, जी मुलीपेक्षा 5 वर्षाने आहे मोठी; 23 वर्षाने मोठ्या पुरूषासोबत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:20 IST2024-01-11T14:19:39+5:302024-01-11T14:20:35+5:30

वयात इतका फरक असल्याने लोक तिला ट्रोल करते. पण अजूनही एक कारण आहे ज्यामुळे लोक तिला ट्रोल करतात.

20 year old girl marry 43 year old man become step mom of 15 year old daughter | 20 वर्षीय सावत्र आई, जी मुलीपेक्षा 5 वर्षाने आहे मोठी; 23 वर्षाने मोठ्या पुरूषासोबत केलं लग्न

20 वर्षीय सावत्र आई, जी मुलीपेक्षा 5 वर्षाने आहे मोठी; 23 वर्षाने मोठ्या पुरूषासोबत केलं लग्न

असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. त्यामुळे ते जात, धर्म, गरीब, श्रीमंत असं काही बघत नाही. बरेच लोक आपल्यापेक्षा वयाने जास्त व्यक्तींच्या प्रेमात पडतात. त्यांच्या वयात जास्त अंतर असलं तरी त्यांना फरक पडत नाही. असंच एका तरूणीसोबत झालं. ही तरूणी केवळ 20 वर्षांची आहे आणि तिचा पती तिच्यापेक्षा 23 वर्षाने मोठा आहे. वयात इतका फरक असल्याने लोक तिला ट्रोल करते. पण अजूनही एक कारण आहे ज्यामुळे लोक तिला ट्रोल करतात.

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एली लिपट्रॉट (Ellie Liptrot) टिकटॉकवर खूप फेमस आहे. इन्स्टावरही तिचे फॅन्स आहेत. सध्या ती तिच्या लाइफमुळे चर्चेत आहे. एली 20 वर्षाची आहे आणि तिचा पती 23 वर्षाने मोठा आहे. म्हणजे तो 43 वर्षाचा आहे. मार्कने एलीसोबत दुसरं लग्न केलं. ती त्याची पत्नी होताच तिच्यावर दोन मुलांची जबाबदारी देखील आली. एली लग्न होताच एका 15 वर्षाच्या मुलीची आणि एका 11 वर्षाच्या मुलाची आई झाली. 

एली म्हणाली की, सावत्र आई बनणं फारच आनंद देणारा अनुभव आहे. तिचं मत आहे की, तिला ट्रोल असेच लोक करतात ज्यांनी कधी अशाप्रकारचा अनुभव घेतला नाही. बरेच लोक तिला गोल्ड डिगर म्हणतात, म्हणजे तिने पैशांसाठी वयाने मोठ्या व्यक्तीसोबत लग्न केलं असं म्हणतात. लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करतात. तर काही लोक तिला सपोर्टही करतात.

नुकताच एलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात ती पतीसोबत जिममध्ये जाताना दिसत आहे. तसेच त्यांचा फिरायला जाण्याचाही एक व्हिडीओ आहे. डिसेंबरमध्ये तिने एक फोटो पोस्ट केला होता ज्यात ती बर्फाळ ठिकाणी एन्जॉय करताना दिसली. 

Web Title: 20 year old girl marry 43 year old man become step mom of 15 year old daughter