एका झटक्यात 18 वर्षीय मुलगा झाला करोडपती; अकाऊंटमध्ये 74 कोटी, लॉटरीमुळे नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 03:54 PM2023-09-18T15:54:35+5:302023-09-18T15:57:40+5:30

आपला मुलगा इतक्या कमी वयात करोडपती झाला यावर आईचा विश्वासच बसत नव्हता.

18 years old boy become multi millionaire found 74 crores in bank account | एका झटक्यात 18 वर्षीय मुलगा झाला करोडपती; अकाऊंटमध्ये 74 कोटी, लॉटरीमुळे नाही तर...

फोटो - CANVA

googlenewsNext

प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं, परंतु कोणाचं नशीब कसं आणि कधी फळफळेल हे सांगता येत नाही. काही लोक असे आहेत की ज्यांना कोणतेही कष्ट न घेता करोडो रुपये मिळतात. असंच काहीसं एका 18 वर्षांच्या मुलासोबत घडलं, तो एका क्षणात करोडपती झाला आहे. अकाउंट स्टेटमेंट पाहून मुलगा हैराण झाला.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या मुलाचं नाव डेन गिलेस्पी आहे आणि अचानक करोडपती झाल्यानंतर त्याला काय करावं हे समजत नव्हतं. मजेशीर गोष्ट म्हणजे या मुलाने कोणतीही लॉटरी काढली नव्हती किंवा तो असा कोणताही व्यवसाय करत नव्हता ज्यामध्ये तो रातोरात नफा कमवू शकेल. असं असतानाही मुलाच्या खात्यात एवढे पैसे आले कुठून? यामागचं कारण जाणून घेऊया...

बँकेची चूक, मुलगा करोडपती

डेन गिलेस्पीला आजीच्या अकाऊंटवरून आपल्या अकाऊंटला £8,900 म्हणजेच 9 लाख 17 हजार रुपये पाठवायचे होते, परंतु गोंधळ असा झाला की, £8,900 चे £8.9million झाले आणि 73 कोटी 97 लाख रुपये थेट मुलाच्या खात्यात आले. आपलं अकाऊंट पाहून मुलगा स्वतःच हैराण झाला. हे पैसे त्याला मिळालेल्या रकमेच्या थेट 1000 पट होते. हा प्रकार मुलाने आईला सांगितल्यावर तिला धक्काच बसला. 

आपला मुलगा इतक्या कमी वयात करोडपती झाला यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या खात्यात खूप पैसे होते, तरीही त्याने आपल्या आईला याबद्दल सांगितले आणि तिने त्याला चांगला सल्ला दिला. आईने सांगितले की हे त्यांचे पैसे नाहीत आणि त्यांनी हे प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी काही तासांनंतर पैसे त्याच्या खात्यातून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 18 years old boy become multi millionaire found 74 crores in bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Monkeyमाकड