जि.प.ने दिला विना स्वाक्षरीचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:46 IST2019-11-15T23:45:42+5:302019-11-15T23:46:11+5:30

जळगाव : ३९ हजार रूपयांच्या ग्रामनिधीच्या धनादेशावर जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याने फेकरी ग्रामपंचायत गोंधळात पडली़या प्रकाबाबत जिल्हा ...

Zip without a signed check | जि.प.ने दिला विना स्वाक्षरीचा धनादेश

जि.प.ने दिला विना स्वाक्षरीचा धनादेश


जळगाव : ३९ हजार रूपयांच्या ग्रामनिधीच्या धनादेशावर जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याने फेकरी ग्रामपंचायत गोंधळात पडली़या प्रकाबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड यांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून दिली़३९ हजार चारशे दहा रूपयांचा हा धनादेश ६ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता़ हा निधी स्वाक्षºया करून तो परत देतो, असे गायकवाड यांनी सांगितले़या प्रकाराची गुरुवारी जिल्हा परिषदेत एकच चर्चा सुरु होती.दरम्यान, सावकारे यांनी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांबाबत शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली.

Web Title: Zip without a signed check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.