शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

जि.प. शाळेने सुरू केली ‘ई-लायब्ररी’

By admin | Updated: April 28, 2017 23:56 IST

बाळद येथील डिजिटल वाटचाल : विद्याथ्र्याकडून होतेय आवडीने वाचन

बाळद, ता.पाचोरा : जि.प. शाळा म्हणजे सुविधांचा अभाव, तंत्रसुविधा तर दूरच, असा दृष्टिकोन सर्वसाधारणपणे तयार झाला आहे. मात्र आता काही शाळा विविध सुविधांसह डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरही करू लागल्या आहेत. बाळदसारख्या लहान गावातील जि.प. शाळेचे विद्यार्थी दररोज ई-लायब्ररीचे वाचन करू लागले आहेत. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत वाचन संस्कृती वाढवणे, टिकवणे, जोपासणे हे ध्येय डोळयासमोर ठेवून या शाळेतील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक अरुण पाटील यांनी जिल्हा व राज्यातील अनेक संकेत स्थळांना भेटी देऊन अनेक ई-पुस्तकांचा संग्रह केला व ही लायब्ररी  सुरू केली. ई-लायब्ररी शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने हे महत्त्वाचे पाऊल आहे.बहिणाई  ई-लायब्ररीखान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव या  ई-लायब्ररीला देण्यात आले आहे. या  ई-लायब्ररीत पीडीएफ व ऑडिओ स्वरूपातील  ई-पुस्तके  आहेत. विद्याथ्र्याच्या सोयीसाठी बोधकथा, ऐतिहासिक पुस्तके, कथा, कादंब:या, इंग्रजी साहित्य, मराठी-इंग्रजी व्याकरण, काव्यसंग्रह, नेत्यांची, शास्त्रज्ञांची माहिती, स्वातंत्र्य सैनिकांचे मनोगत, स्पर्धा परीक्षा, शिक्षक मार्गदर्शिका, ज्ञानरचनावादी साहित्य, पहिली ते आठवीर्पयतची क्रमिक पाठय़पुस्तके, राज्यातील गड, किल्ले, दासबोध ग्रंथ, ज्ञानेश्वरी असे विविध फोल्डर समाविष्ट केले आहे. या लायब्ररीत दैनंदिन अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके समाविष्ट केल्यामुळे विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो कमी झाले आहे. अशी लायब्ररी जिल्ह्यात क्वचितच असावी.आयएसओ नामांकन शाळाबाळद जि.प. शाळेला 2016  मध्ये आयएसओ नामांकन मिळाले आहे.  शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नेहमीच लोकसहभागातून विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवतात.  लोकसहभागातून पहिली व दुसरीचा वर्ग डिजिटल असून भविष्यात सर्व वर्ग डिजिटल करण्याचा मानस आहे.  शाळेचा ब्लॉग- (ं14ल्ल 2 स्रं3्र’ ु’ॅ.ूे) तयार केला असून त्यावर शैक्षणिक तसेच ई-लायब्ररीचा समावेश आहे. यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, गटशिक्षणाधिकारी जितेंद्र महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, केंद्रप्रमुख दिलीप शिरसाठ, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)बहिणाई  ई-लायब्ररी ही केवळ विद्याथ्र्यासाठीच नव्हे, तर पालकांसाठीदेखील अवांतर वाचनाचा छंद जोपासण्यासाठी उपयुक्त आहे. ही लायब्ररी शाळेत, परिसरात, घरी व कुठेही वाचक व विद्यार्थी आपल्यासोबत मोबाइलमध्ये घेऊन जाऊ शकतो. ई-पुस्तके डाऊनलोडसाठी अत्यल्प डाटा लागतो. डाऊनलोड केलेले ई-पुस्तक वाचक व्हॉट्सअॅप व टेलिग्रामद्वारे इतरांना पाठवू शकतात.  4शाळेतील विद्यार्थी आपल्या पालकांच्या मोबाइलमध्ये  ई-लायब्ररी उघडून घरीदेखील वाचन करू शकतात. मधल्या सुटीत शाळेतील सर्व विद्यार्थी प्रोजेक्टवर एकाच वेळेस वाचन करू शकतात.  परिपाठात ऑडिओ पुस्तकांचे श्रवण करतात.  4या ई-लायब्ररीमुळे विद्याथ्र्याच्या शब्दसंग्रहात वाढ झाली आहे.  विद्याथ्र्याना प्राथमिक स्वरूपात संभाषण कौशल्य वाढविण्यास मदत होते. या ई-लायब्ररीमुळे विद्याथ्र्याना वाचनाची आवड निर्माण झाली. तसेच तंत्रज्ञानाचे संस्कार त्यांच्यावर होतात. ई-लायब्ररीत एकाच क्लिकवर एकाच वेळी अनेक पुस्तके उपलब्ध होतात.