शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

नशिराबाद येथील तरुणाला ट्रकने चिरडले, ट्रक सोडून चालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 18:05 IST

पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला

ठळक मुद्देकुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोशभरतीपूर्वीच दीपकवर काळाची झडप

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि़ 24 - खाकी वर्दीचे स्वपA उराशी बाळगून पोलीस भरतीच्या तयारीसाठी महामार्गावर धावणा:या नशिराबाद येथील दीपक गौतम सावळे (वय- 23) या तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी 6़30 वाजेच्या सुमारास नशिराबादजवळ राष्ट्रीय महामार्गावर त्रिमूर्ती मुंजोबाच्या मंदिराजवळ घडली़ घटनेनंतर ट्रक सोडून चालक पसार झाला़ नशिराबाद पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आह़ेदीपक सावळे हा नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगरात परिवारासह राहतो़ मलकापूर येथील महाविद्यालयात बाहेरुन डी फार्मसीचे शिक्षण घेत आह़े 12 वी पास झाल्यापासून त्याचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न होत़े शारिरीक चाचणीच्या दृष्टीने दीपक हा त्याच्या मित्रासोबत पहाटे 5 वाजेच्या महामार्गावर धावत अस़े नेहमीप्रमाणे रविवारी दीपक हा त्याच्या मित्रासोबत महामार्गावर धावण्यासाठी गेला होता़ महामार्गाला रस्त्याच्या एका बाजूने नशिराबादकडे धावत परतत असताना भुसावळहून जळगावकडे येत असलेल्या ट्रकने (क्र  ़सी़जी़ 04़डी़ए़5636) ने मागून जोरदार धडक दिली़ त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला़ दीपकच्या पश्चात्त आई, वडील, भाऊ अजरून व ललीता व शिला या दोन बहिणी असा परिवार आह़े ललीता विवाहीत असून पुण्याला नांदते तर अजरून व शीला शिक्षण घेत आह़े 

चालक ट्रक सोडून घटनास्थळाहून पसारअपघाताची माहिती मिळताच नशिराबाद ग्रामपंचायत सदस्य विनोद रंधे, ग्रामस्थ विनोद रंधे, शुभम सपकाळे, पप्पू गालफाडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ रिक्षातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला़ जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांनी रुग्णालयात जावून नातेवाईकांची भेट घेतली़ व शवविच्छेदनानंतर मृतदेह नशिराबादला हलविला़घटनास्थळावरुन चालक ट्रक सोडून पसार झाला होता़ माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षकअशोक खरात, सहाय्यक पोलीस निरिक्षक आऱटी़धारबळे, निळकंठ महाजन, शांताराम तळेले, शाम काळे, राजेंद्र साळूंखे यांनी घटनास्थळ गाठल़े व ट्रक ताब्यात घेतला़ याप्रकरणी विनोद भगवान रंधे यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलिसात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े सपोनी आऱटी़धारबळे तपास करीत आहेत़

भरतीपूर्वीच दीपकवर काळाची झडप27 डिसेंबरला मुंबई येथे पोलीस भरती मंगळवारी दीपक मुंबईला जाणार होता़ या भरतीसाठी महिनाभरापासून त्याची शारिरीक चाचणीसाठी जोरदार तयारी सुरु होती़ लेखी परीक्षेच्या अभ्यासाठी त्याने चार महिन्यांपूर्वी महिन्यात स्वातंत्र्य चौकातील नवभारत अॅकडमी येथे क्लास लावला होता़ तीन दिवसांवर भरती असल्याने शारिरीक चाचणीच्या दृष्टीने धावणे यासह इतर गोष्टींचा त्याचा कसून सराव सुरु होता़ यासाठी तो दोन ते तीन दिवसांपासून क्लासलाही आला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयात दीपकच्या मित्रांनी दिली़

कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोशशांत व मनमिळावू स्वभाव तसेच मेहनती मुलगा म्हणून दिपक गावात सर्वाना परिचित होता़ अपघाताची माहिती मिळताच त्याच्या मित्रपरिवारासह नागरिकांनी दीपकच्या घरी गर्दी केली़  व कुटुंबियांचे सात्वन केल़े आई,वडीलांसह बहिणीचा आक्रोश बघून उपस्थित सर्वाचेच डोळे पाणावले होत़े पुणे येथील बहिणी पोहचल्यावर सायंकाळी शोकाकूल वातावरणात दीपकवर अत्यंसंस्कार करण्यात आल़े घटनेमुळे  मुक्तेश्वरसह नशिराबाद सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आह़े