जळगाव तालुक्यातील कु-हाडदे येथील तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:58 IST2018-06-15T11:58:03+5:302018-06-15T11:58:03+5:30

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी समाधान पाटील हे तणावात होते

A youth of Kuddev in Jalgaon taluka committed suicide | जळगाव तालुक्यातील कु-हाडदे येथील तरुणाची आत्महत्या

जळगाव तालुक्यातील कु-हाडदे येथील तरुणाची आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील कुºहाडदे येथील समाधान बाबुलाल पाटील (३८) या तरुणाने गुुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी समाधान पाटील हे तणावात होते, असे सांगण्यात आले.
या बाबत जिल्हा रुग्णालयात पोलीस पाटील सुरेश न्हाळदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हे ट्रक चालक असून गावात त्यांच्या वडिलांच्या नावावर शेतीदेखील आहे. शेतीमध्ये पेरणी केल्यानंतर पाऊसच आला नाही. या कारणासह इतरही काही कारणामुळे समाधान पाटील हे तणावात होते. या तणावातून त्यांनी गुरुवारी गावातीलच डबरच्या खदाणीनजीक विष प्राशन करून आत्महत्या केली. या ठिकाणाहून मेंढपाळ जात असताना त्यांना हे दृष्य दिसले व त्यांनी या बाबत पोलीस पाटील न्हाळदे यांना बाबत माहिती दिली. त्यानंतर न्हाळदे व इतर ग्रामस्थांनी पाटील यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.
मयत समाधानच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title: A youth of Kuddev in Jalgaon taluka committed suicide