जळगावात नाल्याच्या पुरात वाहून तरुण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:04 IST2018-08-16T19:59:46+5:302018-08-16T20:04:05+5:30
नाल्याच्या पुलावरुन तोल गेल्याने हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर,मुळ रा.तरसोद) हा तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरात घडली.

जळगावात नाल्याच्या पुरात वाहून तरुण बेपत्ता
जळगाव : नाल्याच्या पुलावरुन तोल गेल्याने हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर,मुळ रा.तरसोद) हा तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरात घडली. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे नाल्याचे पाणी वाढले, त्यामुळे हा तरुण या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत वाणी या तरुणाचे घर नाल्यापासून जवळच आहे. गुरुवारी नाल्याच्या पुलावर थांबलेला असताना नाल्यात हातातील छत्री पडली. ही छत्री काढण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने हेमंत नाल्यात पडला व पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील रहिवाशी व मनपाच्या पथकाने नाल्यात उतरुन तरुणाचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही.