भुसावळमध्ये तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 07:17 IST2020-08-26T07:15:21+5:302020-08-26T07:17:50+5:30

पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू; तीन-चार जणांनी हल्ला केल्याची माहिती

youth died in Knife attack and firing in Bhusawal | भुसावळमध्ये तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

भुसावळमध्ये तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

भुसावळ: शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवासी विलास दिनकर चौधरी या तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे . ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

विलास चौधरी घराबाहेर फोनवर बोलत असताना काळे कपडे घालून आलेल्या तीन ते चार तरुणांनी त्याच्या दंड व पोटावर चाकू हल्ला केला. यावेळी विलास चौधरी घरात पळून गेला आणि त्यानं दरवाजा बंद केला. मात्र या तरुणांनी पुन्हा घराकडे येऊन दरवाज्यावर दगडफेक करून घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला आणि गोळीबार करून  पसार झाले. डीवायएसपी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यासंदर्भात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी संपर्क साधला असता तीन ते चार आरोपी असू शकतात, असे परिवारातील लोकांनी सांगितले. त्यांनी आरोपींना पाहिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: youth died in Knife attack and firing in Bhusawal