जळगावात भाजपा सरकारविरुद्ध युवक काँग्रेसचे निषेधासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 13:13 IST2018-11-01T13:13:19+5:302018-11-01T13:13:31+5:30
अनोखे आंदोलन

जळगावात भाजपा सरकारविरुद्ध युवक काँग्रेसचे निषेधासन
जळगाव : केवळ भुलथापा देणाऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘निषेधासन’ हा व्यंग योगासनांचा कार्यक्रम घेण्यात आला. राज्यातील भाजपा सरकारला चारवर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाही दिल्या.
युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वात सकाळी ९ वाजेपासून हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राहुल मोरे, युवक जिल्हा सरचिटणीस डॉ. शोएब पटेल व अमोल राऊळ, विधानसभा अध्यक्ष मुजीब पटेल, अलीम शेख, किरण पाटील, किरण सोनवणे, अमोल माळी, दीपक राजपूत, नीरज बोरखडे, शेख अन्वर, सचिन राजपूत, पिंटू पाटील, सुधाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आशुतोष राठोड, अभिजीत पाटील, बबलू भोलाणे, वासुदेव नानोटे, फैझान शेख, मोहसीन शाह, आयुब सय्यद, गौरव पाटील, विशाल पाटील, सागर वानखेडे तसेच युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे होते आसनांचे प्रकार
या आसनात राफेल मुद्दा दर्शवण्यासाठी राफेलासन, महागाई चा मुद्दा दर्शवण्यासाठी महागाईआसन, भाजपा नेते गुन्हे करून सुद्धा क्लीन चिट मिळत असल्याने क्लीनचीटासन, सरकार विरोधी नेत्यांना देत असलेल्या धमक्यांचाचा मुद्दा दर्शविण्यासाठी धमकीआसन, तरुणाच्या बेरोजगारांचा मुद्दा दर्शवण्यासाठी बेरोजगारासण तसेच गाजरासन अशा विविध प्रकारचे सरकार विरोधी व्यंग आसने करून जनतेचे लक्ष वेधले.