उमर्दे येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, विषबाधेने विखरण व पिंपरी येथे दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:45+5:302021-09-12T04:19:45+5:30

एरंडोल : येथून जवळपास चार किलोमीटर अंतरावरील म्हसावद रस्त्यालगतच्या उमर्दे येथे १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास नीलेश ...

Youth commits suicide by hanging at Umarde, scattering due to poisoning and both die at Pimpri | उमर्दे येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, विषबाधेने विखरण व पिंपरी येथे दोघांचा मृत्यू

उमर्दे येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, विषबाधेने विखरण व पिंपरी येथे दोघांचा मृत्यू

एरंडोल : येथून जवळपास चार किलोमीटर अंतरावरील म्हसावद रस्त्यालगतच्या उमर्दे येथे १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास नीलेश पांडुरंग पाटील (३०) या युवकाने राहत्या घरात पुढच्या खोलीमध्ये छताच्या लोखंडी कडीला वायर बांधून गळफास घेतला.

पिंपरी बुद्रूक येथे दिव्या संजय पाटील (१६) या शाळकरी मुलीला घरी विषबाधा झाल्याने तिला उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मृत्यू झाला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला कागदपत्र प्राप्त झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विखरण येथे अशोक जगन पाटील (४०) याने ६ सप्टेंबर रोजी रात्री विषारी पदार्थ सेवन केल्याने त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता १० सप्टेंबर रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पाटील, राम पाटील, काशिनाथ पाटील, अखिल मुजावर, संदीप सातपुते, राजेश पाटीलख, पंकज पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide by hanging at Umarde, scattering due to poisoning and both die at Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.