शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

चोरीच्या पश्चातापाने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:28 IST

दोन दिवसापूर्वीच सुटला होता जामीनावर

ठळक मुद्देहातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप

जळगाव : चोरीच्या घटनेत अटक होऊन दोन दिवसांपूर्वीच जामीन झाल्यानंतर आपल्या हातून घडलेल्या घटनेच्या नैराश्यातून एका तरुणाने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी असोदा रेल्वेगेटनजीक डाऊन मार्गावर घडली. दुपारी ४ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.संघर्ष उर्फ राजेश संजय ठाकरे (२२, रा. वाल्मीक नगर, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.दुपारी १२ वाजेच्या दरम्यान रेल्वे डाऊन लाईनवर असोदा रेल्वे गेटजवळ एका युवकाने आत्महत्या केली असल्याची माहिती तालुका पोलिसांना रेल्वेचे उप स्टेशन प्रबंधक आर. के. पलरेजा यांनी तालुका पोलिसांना दिली. या प्रकारानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. यातील काही युवकांनी संघर्षला ओळखले.लहान भावाने दिली वडिलांना माहितीसंघर्ष हा दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर गेला असल्याची माहिती त्याचा भाऊ अर्जुन याने वडिल संजय माधव ठाकरे यांना कळविली होती. यावरून त्याच्या वडिलांनी संघर्षच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र तो बंद आला. १२.४० वाजेच्या दरम्यान त्याने आत्महत्या केल्याची बातमी वडिलांना कळाली व त्यांनी घराकडे धाव घेतली.सागरपार्कवरून घेतली धावसंघर्षचे वडिल विवेकानंद प्रतिष्ठान शाळेच्या स्कूल बसचे चालक आहेत. सागर पार्कवर सुरू असलेल्या ‘पुलोत्सव’ कार्यक्रमस्थळी ते होते. मुलाने आत्महत्या केल्याचे कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. ते घरी आले त्यावेळी घराजवळ प्रचंड गर्दी होती. घटनेचे वृत्त कळताच तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा आटोपून मयत संघर्षचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला.सुन्न होऊन बसले वडीलसंघर्षच्या खिशात जळगाव ते भुसावळ असे रेल्वेचे तिकीट पोलिसांना आढळून आले. सकाळी १० वाजेच्या दरम्यान हे तिकीट काढले असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. त्याच्या घरी वडिल, दोन लहान भाऊ यात अर्जुन हा दहावीत शिकतो व त्याच्यापेक्षा लहान हितेश हा सहावीत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात संघर्षचे वडिल सुन्न होऊन बसले होते. ४ वाजेच्या दरम्यात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.हातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप२३ डिसेंबर रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका चोरीच्या घटनेत चार दिवसांपूर्वी संघर्षला पोलिसांनी अटक केली होती. त्यात त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. ९ रोजी त्याचा जामीनही झाला होता. या घटनेत त्याच्याकडून १२ हजाराची रोकडही जप्त करण्यात आली होती, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी सांगितले. तर या मुलाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तो चांगल्या कुटुंबातील असल्याचे लक्षात आल्याने असे प्रकार भविष्यात त्याने करू नये म्हणून पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनीही त्याची समजूत घातली. घटनेबाबत त्यालाही पश्चाताप झाल्याचे त्याच्या बोलण्यातून लक्षात येत होते व त्यामुळे तो निराशही झाला होता असे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी सांगितले. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तपासणी केली असता मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठी वा कुणालाही काहीही सांगितले नव्हत्त, असेही पोलिसांनी सांगिलते. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.