अश्लीळ चाळे भोवले..... तरुण खातोय तुरुंगाची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:31 IST2019-12-29T22:30:50+5:302019-12-29T22:31:11+5:30
विवाहिचेची तक्रार

अश्लीळ चाळे भोवले..... तरुण खातोय तुरुंगाची हवा
जळगाव : घरासमोर भांडी घासत असलेल्या २७ वर्षीय विवाहितेसोबत शेख कलीम शेख रफिक (२०, रा.तांबापुरा, जळगाव) याने जबरदस्तीने अश्लीळ चाळे करीत प्रतिकार करणाऱ्या महिलेच्या दीराशीही त्याने झटापट केल्याची घटना शनिवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या शेख कलीम याला पोलिसांनी रात्रीच अटक केली.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला शनिवारी रात्री साडे नऊ वाजता जेवणानंतर घरासमोर भांडी घासत असताना शेख कलीम याने तेथे येवून विवाहितेसोबत अश्लीळ चाळे केले. हा प्रकार पाहिल्यानंतर विवाहितेचा दीर धावून आला असता शेख कलीम याने त्याच्याशी झटापट करुन बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित महिलेने रात्रीच एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांची भेट घेऊन घटनाक्रम सांगितला व तक्रार दिली.
त्यानुसार शेख कलीम याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, उपनिरीक्षक संदीप पाटील, मुदस्सर काझी, इम्रान सय्यद यांनी रात्रीतूनच फरार झालेल्या शेख कलीम याला अटक केली.