शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

तरुण व नातेवाईकांना टोळक्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:47 IST

रेल्वेस्थानक व कोल्हे हिल्स परिसरातील दुपारचा थरार, कुणलाही अटक नाही

जळगाव : मुलाच्या जाऊळाच्या कार्यक्रमासाठी येत असलेल्या शालकाला रेल्वे स्थानकावर घेण्यास गेलेल्या चेतन संजय करोसिया (२५, रा़ वाघनगर) या तरूणाला दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण करीत डोक्यावर काचेचा ग्लास फोडून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ हा प्रकार एवढ्यावर न थांबता हल्लेखोरांना आपला मोर्चा कोल्हे हिल्सच्या दिशेने वळवित तेथे चेतन याचे नातेवाईक नेहाल संजय शिंदे (रा़ समतानगर) व विशाल अनिल घेंगट (२१, रा़ वाघनगर) यांना रस्त्यात गाठत बेदम मारहाण केली व नेहाल याच्यावर धारधार शस्त्राने वार केला़ तरूणांच्या टोळीकडून झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.डोक्यावर फोडला काचेचा ग्लासचेतन याला मारहाण सुरू असताना टोळीतील एकाने बाजूलाच सरबतच्या गाडीवरील काचेचा ग्लास उचलून तो त्याच्या डोक्यावर फोडला़ त्यात चेतन हा गंभीर जखमी झाला व हल्लेखोरांनी तेथून पळ काढला़ त्यानंत चेतन यास जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले़ आणि तातडीने त्याच्या प्राथमिक उपचार करण्यात आले़अन् दोघांना रस्त्यात गाठलेहल्लेखोर तरूणांनी चेतन याला मारहाण केल्यानंतर आपला मोर्चा कोल्हे हिल्सच्या दिशेने वळविला़ चेतन याचे नातेवाईक असलेले नेहाल व विशाल दोघेही चेतन याच्या घरी पुजेचे साहित्य घेवून दुचाकीने जात होते़ त्यांना वाटेतच गाठत या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली़ यात नेहाल याच्या चेहऱ्यासह हाता-पायाला गंभीर दुखापत झाली व त्यांच्यावर चॉपरने वार केला़ तर विशाल यालाही चेहºयावर गंभीर दुखातप झाली़ नंतर हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला़ जखमींना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़

टॅग्स :Jalgaonजळगाव