तलवार घेवून फिरणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 22:07 IST2019-12-05T22:07:08+5:302019-12-05T22:07:56+5:30
जळगाव : सुप्रीम कॉलनीमधील मच्छी मार्केट परिसरात हातात तलवार घेऊन फिरत परिसरात भीती पसरविणाºया पूनम दीपक साळुंखे (२९, रा. ...

तलवार घेवून फिरणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात
जळगाव : सुप्रीम कॉलनीमधील मच्छी मार्केट परिसरात हातात तलवार घेऊन फिरत परिसरात भीती पसरविणाºया पूनम दीपक साळुंखे (२९, रा. सुप्रीम कॉलनी, नवनाथ नगर) या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत परिसरात भीती पसरवित असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, महेंद्रसिंग पाटील, महेंद्र गायकवाड, पो.कॉ. सतीष गर्जे, गोविंदा पाटील यांच्या पथकाला सूचना केल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन तरुणास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ६ इंच लांबीची पिवळ््या धातूची मुठ असलेली सुमारे २५ इंच लाब अशी एकूण ३१ इंच लांबीची व दीड इंच रुंदीची लोखंडी पाते असलेली तलवार जप्त करण्यात आली आहे. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.