शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात गावठी कट्ट्यासह कोळंब्याचा तरुण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:06 IST

चोपडा : येथे चोपडा-धरणगाव रस्त्यावर कोळंबा येथील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल आढळून आले. मुद्देमालासह पोलीसांनी तरुणास रविवारी सायंकाळी सव्वासातच्या ...

चोपडा : येथे चोपडा-धरणगाव रस्त्यावर कोळंबा येथील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल आढळून आले. मुद्देमालासह पोलीसांनी तरुणास रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी योगेश पन्नालाल भोई (वय २०) हा चोपडा ते धरणगाव रस्त्याने जात असून त्याच्या ताब्यात एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांना मिळाली होती.धरणगाव रोडवर रचला सापळापोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाने पथक चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोहचले. शहर पोलीस स्टशनचे प्रभारी अधिकारी विनायक लोकरे यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी पोलीस नाईक प्रदीप राजपूत, शेषराव तोरे, प्रकाश मथुरे, मिलिंद सपकाळे यांना मदतीसाठी पाठविले. पोलिसांनी चोपडा ते धरणगाव मार्गावर शिरपूर बायपास जवळ सापळा रचला. सांयकाळी सव्वासातच्या सुमारास आरोपी याच मार्गाने पाटचारीकडुन शिरपुर बायपासकडे पायी येत असताना त्यास जागीच पकडले.त्याची झडती घेतली असता कमरेला एक गावठी कट्टा व पॅन्टच्या उजव्या खिशात एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्यासह १५ हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे काळया रंगाचे पिस्तूल व १ हजाराचे काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर मुद्देमाल जप्त करुन आरोपी योगेश भोई यास ताब्यात घेतले. जळगाव येथील पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, प्रविण हिवराळे यांचा समावेश होता.याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस नाईक मनोज दुसाने यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला योगेश भोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पोस्लीस तपास करीत आहेत.