धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 21:49 IST2019-11-08T21:49:08+5:302019-11-08T21:49:40+5:30

जळगाव - दिवाळीनिमित्त घरी आल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी निघालेल्या तरूणाचा मध्यप्रदेशमधील चांदणी गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडून उत्तर प्रदेशातील तरूणाचा ...

Young man dies after falling off train | धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू

जळगाव- दिवाळीनिमित्त घरी आल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी निघालेल्या तरूणाचा मध्यप्रदेशमधील चांदणी गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडून उत्तर प्रदेशातील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघड झाली़ सुधीर गिरी हरिंदर गिरी ( रा़ बालिया, उत्तर प्रदेश) असे मयत तरूणाचे नाव आहे़ शुक्रवारी या तरूणाची ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आले़
उत्तर प्रदेश येथील रहिवासी सुधीर गिरी हा गुजरात राज्यातील कछभुज येथे कामाला होता़ दिवाळीनिमित्त तो घरी उत्तर प्रदेश येथे गेला होता़ त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी तो कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने निघाला़ दरम्यान, मध्यप्रदेशातील चांदणी गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला़ त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात हलविला होता़
५ नोव्हेंबरला सुधीर याचा मृत्यू झाल्यानंतर ६ तारखेला त्याच्या मोबाईलवर कुटूंबीयांचा फोन आला़ त्यावेळी पोलिसांनी घटनेची माहिती दिली व मृतदेह ओळखण्यासाठी जळगाव जिल्हा रूग्णालय येथे बोलविले़ त्यानुसार शुक्रवारी सकाळी सुधीर याच्या कुटूंबीयांना जळगाव गाठत मृतदेह ओळखले़ त्यानंतर शवविच्छेदन होवून मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आले़

 

Web Title: Young man dies after falling off train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.