वरखेड येथे तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 19:03 IST2019-09-15T19:03:35+5:302019-09-15T19:03:52+5:30
भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद भडगाव : तालुक्यातील वरखेड येथे २३ वर्षीय तरुणाचा गावाजवळील विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून ...

वरखेड येथे तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू
भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
भडगाव : तालुक्यातील वरखेड येथे २३ वर्षीय तरुणाचा गावाजवळील विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.
१५ रोजी सकाळी ७ वाजपूर्वी खुशाल माधवराव पाटील हा वरखेड शिवारातील मोतीलाल गुलाब पाटील यांच्या शेतातील विहरीत पाय घसरून पडला व त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
याबाबत दिलीप नथ्थू पाटील यानी दिलेल्या खबरीवरून भडगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी भेट दिली. पुढील तपास पो. कॉ. भास्कर बडगुजर हे करीत आहे.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.