तरूणीचा मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:40 IST2019-11-12T22:40:22+5:302019-11-12T22:40:55+5:30

जळगाव - गुरूनानक जयंतीनिमित्त वृत्त संकलनासाठी आलेल्या तरूणीचा अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास ...

 The young lady's mobile lamp | तरूणीचा मोबाईल लंपास

तरूणीचा मोबाईल लंपास

जळगाव- गुरूनानक जयंतीनिमित्त वृत्त संकलनासाठी आलेल्या तरूणीचा अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास आऱआऱविद्यालयाजवळ घडली़ याप्रकरणी नाजनीन शेख या तरूणीने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे़
भारतनगरातील रहिवासी नाजनीन शेख रईस ही गुरूनानक जयंतीनिमित्त आऱआऱ विद्यालयजवळील गुरूद्वारा येथे वृत्त संकलनासाठी मंगळवारी दुपारी गेली होती़ वृत्त संकलन केल्यानंतर नाजनीन ही दुचाकीजवळ आली असता तिला पर्समधील मोबाईल गायब झाल्याचे दिसून आले़ तिने आजू-बाजूला शोध घेतला मात्र, कुणीतरी पर्समधून मोबाईल लांबविल्याची तिला खात्री झाली़ अखेर सायंकाळी तिने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे़

Web Title:  The young lady's mobile lamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.