सामनेर, ता.पाचोरा : पाचोºयाकडे चारचाकी वाहनाला कट लागल्याने झालेल्या तिहेरी अपघातात ईश्वर सातपुते हा तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली.गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.एच.१९ बी.जे.४१११ हे वाहन जात होते. या दरम्यान नांद्रा येथील जे.सी.बी. संचालक ईश्वर सुरेश सातपुते हे डिझेल नळी घेण्यासाठी गावाकडे मोटार सायकल क्र.एम. एच.१९ ए.झेड २७४६ या गाडीने जात असतांना चारचाकीचा कट लागल्यामुळे रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या डोक्याला मार बसला. मागच्या बाजूने येणाºया मालवाहू वाहन क्रमांक एम.पी.०९ - एच. जी. १९९८ च्या चालकाने मोटार सायकल चालक पडलेला पाहून गाडीचा ब्रेक लावला. अपघातातील जखमी ईश्वर सातपुते यांची तब्बेत स्थिर आहे. जखमीला येथील तरुणांनी तत्काळ पाचोरा रुग्णालयात दाखल केले.
नांद्रा येथील तिहेरी अपघातात तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:14 IST
पाचोºयाकडे चारचाकी वाहनाला कट लागल्याने झालेल्या तिहेरी अपघातात ईश्वर सातपुते हा तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली.
नांद्रा येथील तिहेरी अपघातात तरुण जखमी
ठळक मुद्देपाचोऱ्याकडे जात असताना झाला अपघातजखमीला नागरिकांनी तत्काळ पाचोºयाला हलविले