जळगावला धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात खाली पडून तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:50 IST2018-05-20T23:50:55+5:302018-05-20T23:50:55+5:30

जळगावला धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात खाली पडून तरुण जखमी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २० - धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने हितेश महेंद्र बारे (रा. पाटीलवाडा, शिरपूर) हा तरुण जखमी झाला. ही घटना २० मे रोजी दुपारी १.५५ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हितेश बारे हा रविवारी दुपारी जळगाव रेल्वे स्थानकावर आला. दुपारी १.५५ वाजता मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस स्थानकावरून सुटत असताना या गाडीत हितेशने चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर जखमी झाला.
सुरुवातीला त्याची ओळख पटली नव्हती. त्यामुळे अनोळखी म्हणूनच रेल्वे पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र संध्याकाळी त्याची ओळख पटून तो शिरपूर येथील असल्याचे समोर आले.