विषप्राशन करून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:14 IST2019-09-16T20:14:51+5:302019-09-16T20:14:56+5:30
कळमसरे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या वासरे येथील सोनू कन्हैयालाल पाटील (वय ३०) या तरूण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन ...

विषप्राशन करून तरुणाची आत्महत्या
कळमसरे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या वासरे येथील सोनू कन्हैयालाल पाटील (वय ३०) या तरूण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. ही घटना १५ रोजी घडली.
रविवारी सोनू याने शेतात विष प्राशन केल्याचे समजताच त्याच्यावर प्रथम अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात प्रथमोपचार केला. त्यानंतर धुळे येथे सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानत्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सोमवारी दुपारी वासरे येथे अंत्यसंस्कार झाले.
मयत सोनू हा अविवाहीत व कुटुंबात कर्ता होता. त्याच्यावर विकास संस्थेचे सुमारे ४० हजार पीक कर्ज होते. त्याच्याकडे चार बिघे कोरडवाहू शेती असून, दोन ते तीन वर्षापासून नापिकी व यंदा अतिवृृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेल्याने उत्पन्न बुडाले. तो या विवंचनेत होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील आहेत. वडील कन्हैयालाल पाटील यांच्या खबरीवरून धुळे पोलिसात आकस्मात मृृत्यूची नोंद झाली आहे.