You leave the new one, I want to marry you ... otherwise I will die | तु नव-याला सोडून दे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे...नाही तर मी मरून जाईल

तु नव-याला सोडून दे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे...नाही तर मी मरून जाईल

जळगाव : तु नव-याला सोडून दे, मला तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे. नाही तर मी मरून जाईल...अशी धमकी देत २२ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश दिनेश जाधव (२१, रा. राजमालतीनगर) असे अत्याचार करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.

शहरातील राजमालती नगरातील आकाश दिनेश जाधव या तरुणाचे एका २२ वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. विवाहितेचा पती घरी नसताना आकाश हा तिच्या घरी जात तिला मी मरुन जाईल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करायचा. त्यानंतरही आकाश हा विवाहितेला वारंवार धमकी देत होता. ११ नोव्हेंबर रोजी तो विवाहितेला घेवून बसने नागपूर गेला. नंतर तेथून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावली तालुक्यातील मांजरी येथे विवाहितेला घेवून गेला. त्याठिकाणी त्याने विवाहितेच्या मनाविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित करायचा. त्याला विवाहितेने विरोध केला असता त्याच्याकडून मारहाण करीत शिवीगाळ करायचा, असे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केल आहे.

अजिंठा चौफुलीला सोडून आकाश पसार

दरम्यान, काही दिवस मांजरी येथे राहिल्यानंतर आकाशने त्या विवाहितेला तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी जातो असे सांगून २६ नोव्हेंबरला तो विवाहितेला सोबत घेवून रेल्वेने भुसावळपर्यंत आला. भुसावळातून जळगावपर्यंत बसने प्रवास करीत दोघे जळगावात आले. त्यानंतर आकाशने विवाहितेला अजिंठा चौफुलीपर्यंत सोडले आणि तो याठिकाणाहून पसार झाला.

पीडितेने गाठले पोलीस ठाणे
अंजिठा चौफुलीजवळ सोडल्यानंतर विवाहिता रिक्षाने टॉवर चौकात आली. तिने तिच्या आईला फोन लावला. नंतर आई त्याठिकाणी आली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपुर्ण हकिकत सांगितली. दरम्यान, त्यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात विवाहिता हरविल्याची तक्रार दाखल होती. मात्र, मंगळवारी विवाहिला शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. याठिकाणी तिने दिलेल्या तक्रारीवरुन आकाश दिनेश जाधव याच्याविरुद्ध अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: You leave the new one, I want to marry you ... otherwise I will die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.