शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

एका वर्षात ७० पोलिसांवर कारवाईची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:48 PM

जळगाव : अवैध धंदे चालकांशी सलगी, अवैध धंद्यावर धाड टाकून कारवाईतील जप्त रक्कम आपसात वाटून घेणे,राजकीय लोकांच्या संपर्कात रहाणे, ...

जळगाव : अवैध धंदे चालकांशी सलगी, अवैध धंद्यावर धाड टाकून कारवाईतील जप्त रक्कम आपसात वाटून घेणे,राजकीय लोकांच्या संपर्कात रहाणे, कैद्यांना मदत करणे व लाचखोरी यासारख्या विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या ७० पोलिसांवर वर्षभरात कारवाईची कुºहाड कोसळली आहे. त्यात ३६ जणांना पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे तर ३४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ही धडक कारवाई केली आहे.गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस वर्धापनदिनानिमित्त आयोजित शस्त्र प्रदर्शनात पोलिसांच्या रखवालीतून ३८ स्ट्रमरुगल रिव्हॉल्वरची चोरी झाली होती. तेव्हा तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी विजय अभिमन शिंदे व योगेश श्रीराम मासरे या दोन पोलिसांना हलजर्गीपणाचा ठपका ठेवून निलंबित केले होते.त्याआधी अवैध धंद्याची वसुली करणाऱ्या जिल्ह्यातील ७९ पोलीस कर्मचाऱ्यांना शिंदेंनी मुख्यालयात नवचैतन्य कोर्ससाठी जमा केले होता. फेब्रुवारी महिन्यात शिंदे यांची बदली झाली. त्यांच्या जागी डॉ.पंजाबराव उगले रुजू झाले.उगले यांनी २ एप्रिल रोजी पहिलच विकेट पाडली ती भुसावळचा पोलीस कर्मचारी कुणाल विठ्ठल सोनवणे याची. नांदुरा पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाल्याने सोनवणे याला निलंबित करण्यात आले.चुकीला माफी नाहीच...उगले यांच्या काळातच सर्वाधिक कर्मचारी निलंबित व मुख्यालयात जमा झाले आहेत. कोणी चूक केली तर त्याला माफी नाहीच. कारवाई होऊ नये म्हणून अनेक कर्मचाºयांनी वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा दबाव झुगारुन दोषी पोलिसांवर कारवाई करुन कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा संदेश दिला. चांगले काम करणाºया कर्मचाºयांचा गौरव तसेच बदल्यामंध्ये पारदर्शकता ठेवली.लाचखोरीत अडकले पाच कर्मचारीभुसावळ बाजारपेठचे छोटू माणिक वैद्य, मेहुणबारेचे विजय जाधव, शालिग्राम कुंभार, पहूरचे गजानन पवार व रामानंद नगरचे संभाजी पाटील या चार पोलिसांना लाचखोरीचे गुन्हे दाखल झाल्याने सेवेतून निलंबित करण्यात आले. प्रशांत पाटील याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यालाही निलंबित करण्यात आले. शिवाजी ढबू बाविस्कर, तुषार मधुकर साळुंखे, संतोष पारधी व हितेश बेहरे या चौघांनी अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाईमधील रक्कम सरकारकडे जमा न करता आपसात वाटून घेतल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले.चुकीचे काम करणारे अधिकारी असो की कर्मचारी कारवाई होणारच. चांगले काम करणाºयांच्या पाठीशी राहून त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करतो. प्रत्येकाने जबाबदारी, कर्तव्याला प्राधान्य देऊन प्रामाणिकपणे काम करावे हीच अपेक्षा आहे. आपण जनतेचे नोकर आहोत,त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. जनेतत चांगली किंवा वाईट प्रतिमा तयार करणे आपल्याच हाती आहे. त्यामुळे चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव