कासोद्याच्या यामिनी चौधरीला राज्य स्तरावर सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 15:32 IST2020-02-09T15:32:20+5:302020-02-09T15:32:34+5:30

भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत नववीतील विद्यार्थिनी यामिनी रमेश चौधरी हिला सुवर्णपदक मिळाले.

Yasini Chaudhary of Kasoda gold medal at state level | कासोद्याच्या यामिनी चौधरीला राज्य स्तरावर सुवर्णपदक

कासोद्याच्या यामिनी चौधरीला राज्य स्तरावर सुवर्णपदक

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील साधना विद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस साधना विद्यालयातून ३५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी यामिनी रमेश चौधरी हिला सुवर्णपदक मिळाले.
विद्यालयाचा निकाल १०० टक्के असून, ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे १५ विद्यार्थी, तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.
यामिनीचा प्रभारी मुख्याध्यापक जी. के. सावंत यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल शिक्षिका एल. बी. पाटील यांचा सत्कार एम.एस.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार कार्यक्रमप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.
 

Web Title: Yasini Chaudhary of Kasoda gold medal at state level