यावल येथे बनावट दारुच्या कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:09 IST2018-03-28T13:09:10+5:302018-03-28T13:09:10+5:30
२१० लिटर रसायन, दारुच्या रिकाम्या बाटल्या व अन्य साहित्य जप्त

यावल येथे बनावट दारुच्या कारखान्यावर धाड
आॅनलाइन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि. २८ - हरिओमनगरात सुरू असलेल्या बनावट दारुच्या कारखान्यावर पोलीस निरीक्षक डी. के परदेशी यांच्या पथकाने धाड टाकून २१० लिटर रसायन, दारुच्या रिकाम्या बाटल्या व अन्य साहित्य जप्त केले. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आकाश चोपडे असे संशयीत आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून चोपडे याचा हा गोरख धंदा सुरु होता.
पथकात स. फौ. सिकंदर तडवी, नागपाल भास्कर, पो. का. संजय तायडे, राजेश महाजन, राहुल चौधरी, संजय देवरे यांचा समावेश होता. दरम्यान उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. पवार, दुय्यम निरीक्षक इंगळे हेदेखूल पथकासह या ठिकाणी पोहचले.