शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी गाड्यांच्या `प्लॅटफाॅर्म`ची घोषणा होत असल्यामुळे प्रवाशांची उडतेय तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST

जळगावहून नागपूरकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मार्गासह सुरत मार्गावरूनही अनेक गाड्या नागपूरकडे जात असतात. मात्र, सुरतकडून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या जळगाव ...

जळगावहून नागपूरकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मार्गासह सुरत मार्गावरूनही अनेक गाड्या नागपूरकडे जात असतात. मात्र, सुरतकडून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या जळगाव स्टेशनवर येत असताना, या गाड्या `प्लॅटफाॅर्म` क्रमांक तीनवर येणार की पाच वर येणार, याबाबत जळगाव रेल्वे प्रशासनाकडून लवकर जाहीर करण्यात येत नाही. तसेच याबाबत चौकशी करूनही प्रवाशांना गाडी नेमक्या कुठल्या `प्लॅटफाॅर्म`वर येईल, हे सांगितले जात नाही. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असून, अनेक प्रवासी खाली `प्लॅटफाॅर्म`वर न जाता, दादऱ्यावरच थांबलेले असतात आणि गाडी येण्याच्या दोन ते तीन मिनिटाआधी `प्लॅटफाॅर्म`ची घोषणा होत असल्यामुळे प्रवाशांना धावपळ करीत `प्लॅटफाॅर्म`वर जावे लागत आहे. परिणामी यामुळे एखाद्या प्रवाशाचा दादऱ्यावरून पाय अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो :

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी :

जळगाव रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी येणाऱ्या गाडीच्या `प्लॅटफाॅर्म`ची घोषणा होत असून, संबंधित `प्लॅटफाॅर्म`वर हातातील प्रवासाच्या बॅगा घेऊन खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या `प्लॅटफार्म` तीनवर येत असल्यामुळे, अनेक प्रवासी या `प्लॅटफार्म`वर येऊन बसतात; मात्र, ऐनवेळी रेल्वे प्रशासनाकडून येणाऱ्या गाडीचा `प्लॅटफाॅर्म `बदलविण्यात आला असल्याचे सांगण्याचे वारंवार प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे प्र‌वाशांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत असून, भुसावळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

इन्फो :

जर तीन क्रमांकाच्या `प्लॅटफाॅर्म `वर एक्सप्रेस किंवा मालगाडी उभी राहिली, तर आम्ही पाचव्या क्रमांकाच्या `प्लॅटफाॅर्म`वर गाडी घेतो. जसा `प्लॅटफाॅर्म `उपलब्ध असेल, त्या ठिकाणी आम्ही गाडी घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, प्रवाशांना गाडी कुठल्या ‘प्लॅटफाॅर्म`वर येणार आहे, याची माहिती दहा ते पंधरा मिनिटे आधी उद्घोषणाद्वारे कळवितो. त्यामुळे या वेळात प्रवाशांना सहजच दुसऱ्या `प्लॅटफाॅर्म`वर जाता येते.

अमरचंद अगरवाल, स्टेशन प्रबंधक, जळगाव रेल्वे स्टेशन